२४ तासांत मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 01:10 AM2019-04-19T01:10:03+5:302019-04-19T01:10:46+5:30

सोनू राजपूत (२५) याने आपल्या बारा वर्षीय चुलत भाऊ कुणाल राजपूत याच्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी शहरातील लोधी मोहल्ला येथे घडली.

Accused arrested in 24 hours | २४ तासांत मुसक्या आवळल्या

२४ तासांत मुसक्या आवळल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पत्नीस भडकावल्याने ती माहेरी गेली. याचा राग मनात ठेवून पुतण्या सोनू राजपूत (२५) याने आपल्या बारा वर्षीय चुलत भाऊ कुणाल राजपूत याच्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी शहरातील लोधी मोहल्ला येथे घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
हल्ल्यानंतर आरोपी सोनू राजपूत पसार झाला होता. राजेंद्रसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विरुद्ध भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू होता. यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोनि. संजय देशमुख यांनी दोन पथके तयार केली होती. यानंतर सदर आरोपी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून चाळीसगाव येथे सदर बाजार पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली आहे. सदर बाजारचे पोनि. संजय देशमुख, उपनिरीक्षक निशा बनसोड, विजय जाधव, कर्मचारी कैलास खार्डे, मनोज काळे, वसंत धस आदींनी ही कामगिरी केली आहे. कुणालवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Accused arrested in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.