31 goats burned in fire | ३१ शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा : आखराला अचानक आग लागून ३१ शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. निमखेड येथे मंगळवारी ही घटना घडली. यात २ लाख ७९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील निमखेड येथील शंकरपाल जाळीने बांधलेल्या शेळ्यांच्या आखराला मंगळवारी रात्री ११ वाजेदरम्यान अचानक आग लागली. यात संदीप लिंबाजी कव्हळे व अमोल लिंबाजी कव्हळे यांच्या ३१ शेळ्या जळून मरण पावल्या. त्यांचे पावणे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले सांगण्यात आले. आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. तलाठी भागत राजेजाधव यांनी पंचनामा केला आहे. तर डॉ. रामप्रसाद शेळके यांनी या शेळी मालकांना रोख मदत केली. शेतक-यांनी जनावरांचा विमा उतरावा, असे आवाहन सरपंच लक्ष्मी कव्हळे यांनी केले.