३ हजार ४३९ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:18 AM2019-02-23T00:18:17+5:302019-02-23T00:19:15+5:30

यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ. त्यामुळे स्थलांतरित होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण मोठे असले तरी, विना वसतिगृहांच्या माध्यमातून ३ हजार ४३९ मुलांना गाव सोडण्यापासून रोखण्यास शिक्षण विभागाला यश आले आहे.

3 thousand 439 students stopped migrating | ३ हजार ४३९ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले

३ हजार ४३९ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले

Next
ठळक मुद्देशिक्षण विभागाचे यश : पालकांचे केले समुपदेशन

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ. त्यामुळे स्थलांतरित होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण मोठे असले तरी, विना वसतिगृहांच्या माध्यमातून ३ हजार ४३९ मुलांना गाव सोडण्यापासून रोखण्यास शिक्षण विभागाला यश आले आहे.
स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: जालना जिल्ह्यातून उसतोडीसाठी जाणाºयांची संख्या मोठी आहे. यावर्षी दुष्काळामुळेही स्थलांतराचे प्रमाण वाढते आहे. उसतोड मजूर कुटुंबासह गाव सोडत असल्याने मुलांवर शिक्षण बंद करण्याची वेळ येते, हे विचारात घेत शिक्षण विभागाने स्थलांतरी होणाºया पाल्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करुन विद्यार्थ्यांना स्थलांतरापासून रोखले आहे. जिल्ह्यात त्यामुळे यावर्षी ३ हजार ४३९ मुलांचे स्थलांतर रोखण्यास यश मिळाले. मुलांची त्यांच्याच नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २०१७-१८ साली शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्या मार्गदर्शनानुसार जालना जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत होणाºया कुटुंबातील मुलांना विना वस्तीगृहाचे स्थलांतर थांबविण्याचे व नियमीत शाळेत दर्जेदार शिक्षण देण्यात आले होते. त्यानुसारच २०१८-१९ मध्ये सुध्दा क्षेत्रीय अधिकाºयांच्या मदतीने हे स्थलांतर रोखण्यात आले.
हंगामी वस्तीगृहे नाही
जिल्ह्यात स्थलांतरीत होणाºया विद्यार्थ्यांसाठी मात्र, अद्यापही हंगामी वस्तीगृह उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडे रहावे लागते. तसेच त्यांना शाळेत दोन वेळचे जेवण आणि शैक्षणिक साहित्यही दिले जात नाही.

Web Title: 3 thousand 439 students stopped migrating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.