प्रँक व्हिडीयो बनवताना युट्युबरचं तोंड अडकलं मायक्रोव्हेवमध्ये, फायरब्रिगेडला करावं लागलं पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 06:38 PM2017-12-12T18:38:43+5:302017-12-12T18:48:41+5:30

युट्युबसाठी व्हिडीयो बनवणाऱ्या तरुणांच्या एका गटातील तरुणाला आपली कलाकारी फारच महाग पडली. त्याचा हा प्रयत्न त्याला मृत्यूच्या दारी नेऊन आला.

youtuber stucked in microwave while making prank video in england | प्रँक व्हिडीयो बनवताना युट्युबरचं तोंड अडकलं मायक्रोव्हेवमध्ये, फायरब्रिगेडला करावं लागलं पाचारण

प्रँक व्हिडीयो बनवताना युट्युबरचं तोंड अडकलं मायक्रोव्हेवमध्ये, फायरब्रिगेडला करावं लागलं पाचारण

Next
ठळक मुद्देया चॅनेलद्वारे ते खतरनाक स्टंट्स करून व्हिडिओ अपलोड करत असतात.त्यापैकीच एक व्हिडीयो बनवत असताना हा सगळा प्रकार घडला आणि युट्युबर अडकला.तुम्हीही असं काही करत असाल तर सावधान. कारण तुमची मस्करी तुमच्यावरच उलटू शकते. 

इंग्लड : काही वेळा आपण मस्करी करायला जातो आणि ती मस्करी आपल्याच जीवावर उलटते. मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. असाच एक प्रकार घडला आहे एका युट्यूबरच्या बाबतीत. युट्यूबसाठी प्रँक व्हिडिओ बनवताना एका इसमाचं तोंड मायक्रोवेव्हमध्ये अडकलं. अथक प्रयत्नानेही हे मायक्रोव्हेव निघण्याचं नाव घेत नव्हतं. अखेर फायर ब्रिगेड आणि अॅम्ब्युलन्सला पाचारण करण्यात आलं.

एन.डी.टी.व्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लडच्या वेस्ट मिडलँडमध्ये राहणारा २२ वर्षीय स्विंगलर नावाचा तरुण ७ डिसेंबर रोजी एक प्रँक व्हिडिओ बनवत होता. मायक्रोव्हेवमध्ये सिमेंट टाकून त्याने त्यात आपलं डोकं घातलं. त्याने आपला चेहरा एका पॉलिथिनने झाकून मायक्रोव्हेवमध्ये ठेवला होता. श्वास घेण्यासाठी त्याने प्लास्टिक ट्यूबचा वापर केला होता. मायक्रोव्हेवमधील सिमेंट ओलं होतं. त्यामुळे ते सिमेंट सुकण्याची वाट पाहत होते. सिमेंट सुकण्यासाठी त्याच्या मित्रांनी हेअर ड्रायरचा वापर केला. पण जेव्हा सिमेंट सुकलं तेव्हा मात्र त्याला श्वास घेणं कठीण बनलं. स्विंगलरची आतल्या आत धडपड सुरू झाली. त्याला बोलताही येत नव्हतं आणि श्वासही घेता येत नव्हता. जेव्हा त्याचा मित्र रोमल हेन्रीला कळलं की स्विंगलरला श्वास घेण्यास अडचण होत आहे तेव्हा त्याने डोक्यात घातलेलं मायक्रोव्हेव काढण्याचा अथक प्रयत्न केला. मात्र तरीही ते बाहर आलं नाही. शेवटी त्यांना आपात्कालीन संपर्क साधून तात्काळ अॅम्ब्युलन्स आणि फायरब्रिगेडला बोलावलं. त्यांनी तासाभरात डोक्यात अडकलेला मायक्रोव्हेव बाहेर काढला. वेस्ट मिडलंड्सच्या फायर डिपार्टमेंटने ट्विटमधून ही बातमी दिली तेव्हा नेटिझन्सनेही त्याची बरीच खिल्ली उडवली.


स्विंगलर त्याच्या एका मित्रासोबत युट्युब चॅनेल चालवत आहे. या चॅनेलद्वारे ते खतरनाक स्टंट्स करून व्हिडिओ अपलोड करत असतात. त्यांच्या या चॅनेलला ३ मिनिअन सबस्क्रायबर्स आहेत. हा सगळा प्रकार ७ डिसेंबरला घडला आणि ८ डिसेंबरला त्यांनी हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला. त्यांच्या या व्हिडिओला आता तब्बल ३ मिलिअनपेक्षाही अधिक व्ह्युज आहेत. तुम्हीही असं काही करत असाल तर सावधान. कारण तुमची मस्करी तुमच्यावरच उलटू शकते. 

इतर जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

Web Title: youtuber stucked in microwave while making prank video in england

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.