लंडन : समुद्रात बुडालेल्या आरएमएस टायटॅनिक जहाजाला तुम्ही टीव्हीवर किंवा छायाचित्रांत पाहिले असेल. मात्र, आता या जहाजाला अगदी जवळून पाहण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. लंडनची टूर आॅपरेटर कंपनी ब्लू मार्बल प्रायव्हेट २०१८ मध्ये पर्यटकांना सागर तळाशी विसावलेल्या टायटॅनिकला जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी ब्लू मार्बलने ओशियन गेट या अमेरिकी कंपनीशी करार केला आहे. पर्यटकांना टायटॅनिकजवळ नेण्यासाठी ओशियन गेट विशेष पाणबुडी तयार करत असून, या पाणबुडीतून एकावेळी चार जणांना टॉयटॅनिकजवळ जाता येणार आहे. सायक्लोप्स -२ असे या पाणबुडीचे नाव असून, तिचे एकूण वजन ८,६०० किलोग्राम आहे. ही पाणबुडी एक हजार किलोचे वजन सोबत नेऊ शकते. या पाणबुडीत ९६ तासांसाठी आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध असेल. ब्लू मार्बल खासगी पर्यटकांना कॅनडाच्या न्यूफाउंडलँड बेटाहून हेलिकॉप्टरने उत्तर अटलांटिक महासागरातील त्या ठिकाणी जेथे टायटॅनिकचे अवशेष आहेत.