पाकिस्तानच्या जखमेवर मीठ, अदनान सामीने केले मोदी आणि जवानांचे अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2016 12:43 PM2016-09-30T12:43:56+5:302016-09-30T16:41:36+5:30

मूळचा पाकिस्तानी असलेला मात्र, नुकतंच भारतीय नागरिकत्व मिळालेला गायक अदनान सामीने

On the wounds of Pakistan, salt, Adnan Sami made a felicitation of Modi and the soldiers | पाकिस्तानच्या जखमेवर मीठ, अदनान सामीने केले मोदी आणि जवानांचे अभिनंदन

पाकिस्तानच्या जखमेवर मीठ, अदनान सामीने केले मोदी आणि जवानांचे अभिनंदन

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30-  सर्जिकल स्ट्राइकद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने 35 ते 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि भारतीय सैन्यासोबत पंतप्रधान नरेंद मोदींवर सर्वच स्थरातून कौतुकाचा वर्षावही सुरू झाला. 
 
मूळचा पाकिस्तानी असलेला मात्र, नुकतंच भारतीय नागरिकत्व मिळालेला गायक अदनान सामीही यामध्ये मागे नाही. 'दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबद्दल आपल्या धाडसी जवानांचं आणि पंतप्रधान मोदींचं मनापासून अभिनंदन' असं ट्वीट सामीने केलं आहे. सामीच्या या ट्वीटने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळायचंच काम केलं आहे. पाकिस्तानातून मात्र, सामीच्या या ट्विटवर तिखट प्रतिक्रिया उमटत असून सामीवर चांगलंच तोंडसूख घेण्यात येत आहे. 
 
 
(गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व)
(अदनान सामीला भारतीय नागरीकत्व देण्यावर शिवसेनेची टीका)
1 जानेवारी 2016 रोजी अदनानला केंद्र सरकारने भारतीय नागरिकत्व दिलं होतं. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला भारतीय नागरिकत्व देण्यात यावे असा अर्ज सामीने केला होता.
 

Web Title: On the wounds of Pakistan, salt, Adnan Sami made a felicitation of Modi and the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.