चंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 12:25 PM2019-07-20T12:25:49+5:302019-07-20T12:57:55+5:30

भारतात लिंबू -मिरचीचा वापर खाद्यपदार्थांशिवाय जादूटोण्यासाठीही केला जातो.

When the lemon is hanged to spaceflight by NASA's Commander | चंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा...

चंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा...

Next

भारतात लिंबू -मिरचीचा वापर खाद्यपदार्थांशिवाय जादूटोण्यासाठीही केला जातो. अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे प्रायोगिक अंतराळ यान अनेक संकटात सापडले होते. त्याचे कमांडर गस ग्रिशम यांचा जादूटोण्यावर थोडा विश्वास होता. या विश्वासापोटीच त्यांनी अंतराळयानाच्या मोड्युलबाहेर लिंबू लटकविले होते.


नासा’चा नियम
चंद्रावरून पृथ्वीवर आणण्यात आलेल्या माती, खडक व इतर वस्तूंच्या नमुन्यांबाबत ‘नासा’ने तयार केलेल्या नियमावलीनुसार चंद्राशी संबंधित सर्वच वस्तू ह्या अमेरिकेची संपत्ती असतील आणि त्यांचा वापर केवळ सरकारी उद्देशांसाठीच केला जाऊ शकतो.

अमेरिका आणि चीननंतर भारतानेसुद्धा चांद्र मोहिमेच्या दिशेने वेगवान पावले टाकणे सुरू केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे(इस्रो) अंतराळ मोहीम चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच चीनने आपले अंतराळ यान चांग ई-४ चंद्रावर उतरविले आहे. अपोलो-१७ नंतर अमेरिकेने चंद्रात रुची घेणे बंद केले होते. परंतु आता तोसुद्धा पुन्हा चंद्रावर संशोधनात गुंतला आहे. इ.स. २०२४ पर्यंत चंद्रावर पुन्हा एकदा अमेरिकेच्या अंतराळवीरांची पावले पडू शकतात. चंद्रावर वसाहती निर्माण करून खनिजांचे उत्खनन आणि मोठे उद्योग उभारण्यासाठी ही सगळी चढाओढ आहे. चंद्रावर वस्त्या निर्माण करून खनिज पदार्थांचे उत्खनन करण्याची जगभरातील महाशक्तींची योजना आहे. हे लक्षात घेऊनच चीन, अमेरिका, रशिया आणि भारत प्रदीर्घ कालावधीच्या योजनेवर काम करीत आहे. इ.स. २०३६ पर्यंत चंद्रावर आपला एक स्थायी ठावठिकाणा असावा यासाठी चीन प्रयत्नशील आहे. अग्निबाण बनविण्यासाठी चंद्राच्या भूपृष्ठावर आढळणाऱ्या टायटेनियम, युरेनियम, पोलाद व पाण्याचा वापर करण्याची या देशाची मनीषा आहे.


अनेक देश स्पर्धेत सामील
रशियाच्या अंतराळ संस्थेनेसुद्धा इ.स.२०४० पर्यंत चंद्रावर लोकवस्ती बनविण्याची घोषणा गेल्या वर्षी केली होती. रशियन विज्ञान अकादमीचे प्रमुख अलेक्झँडर सर्गेयेव यांच्या सांगण्यानुसार नैसर्गिक संसाधनांच्या दृष्टीने चंद्र अत्याधिक महत्त्वाचा आहे. जपान आणि दक्षिण कोरियानेसुद्धा चंद्राच्या ध्रुवांवर अंतराळ यान पाठविण्याची घोषणा केली आहे. त्यांचेही लक्ष चंद्रावरील नैसर्गिक स्रोतांच्या वापराकडेच आहे. तिकडे युरोपियन युनियनही चंद्रावर ‘मून व्हिलेज’ वसविण्याचे स्वप्न रंगवते आहे.



४ लाख लोकांचे परिश्रम
५० वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले तेव्हा साºया जगाने आनंदोत्सव साजरा केला होता. या अभूतपूर्व यशामागे एक-दोन नव्हेतर, तब्बल चार लाख लोकांचे अथक परिश्रम होते. १६ जुलै १९६९ साली अपोलो-११ हे अमेरिकन अंतराळ यान प्रथमच मानवासह रवाना झाले होते. चार दिवसांनी २० जुलैला अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. चंद्र्रावर मानवाचे पाऊल पडणे ही मानवी इतिहासातील बहुधा सर्वाधिक महत्त्वपूर्ण उपलब्धी होती. खुद्द आर्मस्ट्राँगनेसुद्धा अपोलो-११ मोहिमेच्या यशाचे श्रेय त्याच्याशी जोडलेल्या हजारो लोकांना दिले होते.

 

Web Title: When the lemon is hanged to spaceflight by NASA's Commander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.