हट्टी मालकांसमोर हार मानून सरकारने बांधले असे विचित्र रस्ते 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 02:39 PM2017-11-20T14:39:41+5:302017-11-20T14:55:23+5:30

सरकारी प्रकल्पामध्ये अडथळे बनणाऱ्या या इमारतींना हटवू नाही शकले प्रशासन. हट्टी मालकांसमोर शेवटी टेकले हात.

weird roads around world and china | हट्टी मालकांसमोर हार मानून सरकारने बांधले असे विचित्र रस्ते 

हट्टी मालकांसमोर हार मानून सरकारने बांधले असे विचित्र रस्ते 

googlenewsNext

चीन : रस्ता बांधण्यासाठी किंवा इतर कोणत्या योजनांसाठी काही जुनी घरं, इमारती सरकारकडून तोडली जातात. त्याबदल्यात मोठा मोबदलाही दिला जातो. आपल्या विभागात सरकारने कोणतीही योजना राबविली की मोठ्या मोबदल्याची अपेक्षा नागरिकांकडूनही केली जाते. पण काही घर-इमारत मालक सरकारच्या या योजनांना अजिबात पाठिंबा देत नाहीत. नागरिकांच्या मनधरणीसाठी सरकार अनेक प्रयत्न करतात. त्यांच्या जागेच्या बदल्यात आणकी मोठी रक्कम दिली जाते. त्यांनतर कुठे जाऊन काहीजण मान्य होतात. पण काही मालक इतके हट्टी असतात की त्यांच्यापुढे सरकारला नमतं घ्यावं लागतं. मात्र असं फार कमी वेळा पाहायला मिळतं. पण चीनमधून अशी काही उदाहरणं समोर आली आहेत. या जिद्दी मालकांपुढे हात टेकल्यावर अभियांत्रिकांनी त्यांचं कौशल्य पणाला लावून कशाप्रकारे रस्ता बनवला हे आपण पाहुया.

चीनमधल्या एका ठिकाणी हायवे बनवण्यात  येणार होता. त्यासाठी त्याठिकणची अनेक घरं तोडली गेली. पण एका मालकाने त्याचं घर तोडण्यास सक्त विरोध केला.

सरकारने त्याला मनवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र तरीही त्या मालकाने आपला हट्टीपणा काही सोडला नाही. वडिलोपार्जित घर असल्याने ते तोडू न देण्याचा निर्णय मालकाने घेतला होता.

त्यामुळे तो सरकारच्या पैशांना भुलला नाही. मालकाचा हट्ट पाहून सरकारही नरमलं. म्हणून सरकारने त्याचं घर अबाधित ठेवत घराच्या आजूबाजूने रस्ता बनवला आहे. या घरात आता कोणीही राहत नाही. मात्र तरीही हे घर तोडण्यास मालकाने पूर्णपणे नकार दिलेला आहे.

तसाच चीनमधल्या घरमालकाच्या जीद्दीपणाचा दुसरा प्रकारही समोर आलाय. ब्रीज बांधण्यासाठी एका इमारतीच्या मालकाने नकार दिल्यावर सरकारने या इमारतीच्या बाजूनेच ब्रीज बनवला.

एकमेंकांना जोडून अनेक पूल या ठिकाणाहून गेल्याचं स्पष्ट दिसतंय. खरंतर जरा लांबून या ब्रीजकडे पाहिल्यावर हे चित्र फार सुरेख दिसतं.

यासाठी हा ब्रीज बांधणाऱ्या अभियांत्रिकाचं कौतुक तर व्हायलाच हवं. पण सरकारने देऊ केलेल्या पैशांनाही न भुलता आपल्या म्हणण्यावर ठाम राहणाऱ्या लोकांनाही दाद द्यायला हवी. 

काही ठिकाणी वडिलोपार्जित घरं तोडण्यास मालकांचा नकार असतो तर काही ठिकाणी सरकारच्या चुकीच्या योजनांवर रागवून मालक आपली जागा सोडण्यास तयार नसतात.

या मालकांना वटणीवर आणण्यासाठी सर्वच स्थरातून प्रयत्न केले जातात. काही ठिकाणी जिवे मारण्याचीही धमकी दिली जाते.

मात्र या सगळ्यांना न घाबरता आपल्या म्हणण्यावर ठाम राहत मालक सरकारला त्यांच्या योजनाच बदलण्यास भाग पाडतं याचीच ही उत्तम उदाहरणं आहेत. 

सौजन्य - www.newstracklive.com

Web Title: weird roads around world and china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.