न्यूयॉर्क : जगण्यासाठी अन्न आणि पाणी ही आमची मूलभूत गरज आहे; मात्र न्यूयॉर्कमधील वेबकॅम मॉडेल पीटर फिलक यांनी गेल्या तीन वर्षांपासून पाण्याचा एक घोटही घेतला नाही. त्यांनी ५ मे २०१२ रोजी शेवटचे पाणी पिले होते. त्यानंतर त्यांनी पाणी पिणे सोडले. सुरुवातीला त्यांना थोडा त्रास झाला. तहान लागल्यानंतर ते सोडा किंवा चॉकलेट मिल्क घेत; मात्र हळूहळू त्यांनी तहानेवर पूर्ण नियंत्रण मिळविले. ते आता कच्च्या भाज्या आणि फळे खाऊन शरीराची पाण्याची गरज भागवतात. शारीरिकदृष्ट्या ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. त्यांच्या शरीरातही पुरेशे पाणी आहे. ते रात्री दोन ते तीन वेळा मूत्र विसर्जनासाठी उठतात. ते पाणी पित नसल्याचे ऐकून अनेक लोकांना आश्चर्य वाटते. आता लोकांना पाणी पिताना पाहणे त्यांना काहीसे वेगळे वाटते.