ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 14 - पश्चिम लंडनमधील ग्रेनफेल टॉवर या 27 मजल्याच्या इमारतीला भीषण आग लागली असून, अग्निशमन दलाचे जवान मागच्या तीन तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. 
 
लंडन फायर अपडेट 
 
- भीषण आगीमुळे ग्रेनफेल टॉवर एका बाजूला कलला असून तो कोसळण्याची शक्यता आहे. 
 
- लंडन अॅम्ब्युलन्स सेवेला रात्री 1.30 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी 20 अॅम्ब्युलन्स तात्काळ घटनास्थळी पाठवल्या. गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. 
 
- लंडनमधील अॅम्ब्युलन्स सेवेने ग्रेनफेल टॉवरच्या आसपासच्या इमारतीत रहाणा-या रहिवाशांना घराचे दरवाजे, खिडक्या बंद करुन घेण्यास सांगितले आहे. कारण धुराच्या लोटामुळे त्रास होऊ शकतो.
 
- या 27 मजली टॉवरचा प्रत्येक मजला आगीच्या ज्वाळांनी वेढला आहे. 
 
 
- पश्चिम लंडमध्ये लागलेल्या या भीषण आगीच्या धुराचा अनेकांना त्रास होत असून डॉक्टरांनी आतापर्यंत 15 जणांवर उपचार केले आहेत. 
 
- अनेकजण त्यांच्या घरामध्ये अडकले असून, वरच्या मजल्यावर राहणारे रहिवाशी त्यांच्या खिडक्यांमधून मदतीसाठी विनवण्या करत आहेत असे वृत्त ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 
 
- ग्रेनफेल टॉवरमध्ये अडकलेल्या अनेकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली असून, काहीजण जखमी झाल्याची माहिती लंडन अग्निशमन दलाने दिली. 
 
- ग्रेनफेल टॉवरमध्ये एकूण 120 फ्लॅट असून अग्निशमन दलाच्या 40 गाडया आणि 200 जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.