बीजिंग- iPhone विकत घेण्याचं वेड किती असू शकतं याचं उदाहरण चिनमध्ये समोर आलं आहे. iPhone-8 साठी येथील एका तरूणीने चक्क आपल्या कौमार्याचा सौदा करण्याचा निर्णय घेतला. तिला खरेदीदार देखील मिळाला पण या सोबतच ती जीवनात कधी न विसरण्यासारखा धडा शिकली. 

 iPhone घेता यावा यासाठी एका 17 वर्षांच्या तरूणीने आपलं कौमार्य विकण्याची तयारी केली आणि तशी जाहिरातही तिने काढली. आपल्या मैत्रिणींकडे असलेले महागडे आणि लेटेस्ट फोन पाहून तिला स्वतःची लाज वाटायची. त्यामुळे मैत्रिणींसमोर शायनिंग मारता यावी यासाठी तिने स्वतःचं कौमार्य विक्रीला काढलं.  त्यानंतर जियो चेन नावाच्या या तरूणीने एका ऑनलाइन फोरमवर स्वतःचं कौमार्य विकण्याची किंमत 2284 पौंड ठेवली. ही रकम रोख हवी अशी तिने अट ठेवली होती. चिनची राजधानी  बीजिंग येथील नाना नावाच्या एका ब्लॉगरची तिच्या जाहिरातीवर नजर पडली. त्याने जियो चेनला चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलं.  जियो चेनसोबत त्याने ग्राहक बनून संपर्क साधला आणि कौमार्य विकत घेण्याची तयारी दाखवली. 

जियो चेनने नानाला वेळ आणि अटींची माहिती देऊन एका हॉटेलमध्ये भेटण्याचा प्लॅन बनवला.  ठरलेल्या वेळी ती नाना वाट पाहात बसलेल्या हॉटेलच्या रूममध्ये पोहोचली. पण ती येण्याआधीच तिला धडा शिकवण्यासाठी नानाने तिच्यासोबत प्रॅंक करण्याची सर्व तयारी केली होती. रूममध्ये येताच त्याने तिला iPhone-8 दिला पण त्याच्यापाठोपाठ रूममध्ये दोन ते तीन तरूण शिरले आणि त्यांनी थेट तिच्यावर बळजबरी करण्यास सुरूवात केली.  अचानक घडलेल्या या प्रकाराने तरूणी प्रचंड घाबरली आणि तिने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. खालील व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून नानाने त्या तरूणीला कशाप्रकारे धडा शिकवला ते तुम्ही पाहू शकतात.   

पाहा व्हिडीओ -


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.