VIDEO: 'It' hangs on the 23rd floor to read from fire | VIDEO: आगीपासून वाचण्यासाठी 'तो' 23 व्या मजल्यावर लटकला

बीजिंग - अपार्टमेंटला आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी एक व्यक्ती 23 व्या मजल्यावर लटकला होता. ही घटना चीनमधील आहे. अक्षरक्ष: मृत्यूच्या जबड्यातून तो बाहेर आला आणि आपला जीव वाचवला. अपार्टमेंटला आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तो 23 व्या मजल्यावरील खिडकीला पकडून लटकत होता. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

13 डिसेंबरची ही घटना आहे. व्हिडीओत एक व्यक्ती वरच्या मजल्याला आग लागली असताना खिडकीला पकडून उभा असल्याचं दिसत आहे. खिडकीला असलेल्या लोखंडाला धरुन तो उभा आहे. खिडक्या बंद असल्याने त्याच्याकडे तिथे उभा राहण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आग जसजशी वाढू लागते, तोच त्याच्या अंगावर आगीचे गोळे पडताना दिसत आहेत. आगीची झळ पोहोचू लागल्याने अखेर तो काच फोडण्याचा प्रयत्न करु लागतो. 

वेळीच अग्निशमन दलाचे जवान त्या रुममध्ये पोहोचतात आणि काच फोडून त्याला आत ओढतात. सुदैवाने त्याला काही गंभीर जखमा होत नाहीत आणि वेळीच जीव वाचतो. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.