#Video : बर्फात अडकलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी जवानांनी लढवली ‘अशी’ युक्ती

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 8:08pm

बर्फाने गोठलेल्या नदीमध्ये हा कुत्रा चुकून पडला आणि त्यानंतर तो तिथे आणखी फसत गेला.

लंडन : बर्फाच्या नदीत अडकलेल्या एका कुत्र्याला अग्निशामक दलातील जवांनानी शर्थीचे प्रयत्न करून वाचवलं आणि बाहेर काढलं. बर्फावर आडवे होत अग्निशमक दलातील जवानांनी कुत्र्याला वाचवल्यामुळे हे जवान आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनच्या एका शहरात या कुत्र्याच्या मालकाने त्याला बाहेर जाण्यास परवानगी दिली. तेव्हा हा कुत्रा थेट नदीच्या किनारी आला. नदीत संपूर्णपणे बर्फ तयार झाला होता. त्यामुळे कुत्र्याने या बर्फावरून चालण्याचा प्रयत्न केला. मात्र चालतानाच त्याचा पाय घसरला आणि तो बर्फातच अडकून राहिला. त्याला बाहेर येणंही कठीण झालं होतं. हा प्रकार जेव्हा कुत्र्याच्या मालकाला दिसला तेव्हा त्यांनी त्वरीत अग्निशमक दलाला पाचारण केलं. काहीच अवधीत हे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.

नदीच्या मधोमध अडकलेल्या कुत्र्याला वाचवणं फार कठीण होतं. त्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनची गरज होती. युक्ती लढवत या जवानांनी एका जवानाला रश्शीने बांधून घेतलं. रश्शीने बांधून घेतलेला जवान बर्फाच्या नदीवरून आडवा होत पुढे गेला. थोडं अंतरावर गेल्यावर त्याने कुत्र्याला पकडलं देखील. मात्र कुत्र्याला पकडल्यावर तो कुत्रा आणखी बर्फात रुतत गेला.

रुतलेल्या कुत्र्याला काढण्यासाठी प्रयत्न करणारा जवानही खाली रुतला गेला. मात्र अग्निशामक दलातील जवानाने त्याला खेचून बाहेर काढलं. कुत्र्याला पकडल्यावर बाहेर उभ्या असलेल्या जवानांनी रश्शीने खेचून त्या  दोघांनाही बाहेर काढलं. बर्फामुळे कुत्रा बराच गारठला होता. त्यामुळे जवानांनी त्याला एका ब्लँकेटमध्ये गुंडाळलं. बाहेर येताच त्याने आपल्या मालकाकडे धाव  घेतली. मालकानेही आपल्या गारठलेल्या कुत्र्याला लगेच मिठीत घेतलं. 

हा व्हिडिओ त्या फायर डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी डेनिस पिलोन यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे. हा फोटो अपलोड झाल्यावर लंडनमध्ये बराच व्हायरलही झाला. याचसोबत फायर डिपार्टमेंटकडून खबरदारीची सूचनाही देण्यात आली आहे. नदीवर बारीक बर्फाचे थर जमा होत असल्याने आपल्या प्राण्यांना आणि लहान मुलांना बाहेर सोडू नये आणि सोडल्यास त्यांच्यावर देखरेख ठेवावी. नाहीतर हा कुत्रा ज्याप्रमाणे नदीत फसला त्याचप्रमाणे इतरजणही फसण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा - लायकाच्या प्रवासाची 60 वर्षे; अंतराळात जाणारा पहिला प्राणी

संबंधित

आणखी एक ऑक्टोबर हिट...आता महागाईचाही बसणार चटका!
अबब... मोबाईलपायी आईने विकले पोटच्या गोळ्याला, निर्दयी आईला अटक 
'या' देशांमध्ये भीक पडतं महागात, मिळते ही शिक्षा!
'आडनावाशिवाय तुमच्याकडे काय आहे?'; राहुल गांधींनी दिलं 'हे' उत्तर
कॅलिफोर्नियामध्ये अकाली दलाच्या नेत्याला बेदम मारहाण

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

अमेरिकेत या ठिकाणी सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा होतोय....कारण वाचून व्हाल भावूक
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार? इंग्लंडमध्ये कायदा
पंतप्रधान कार्यालयातील आलिशान गाड्यांचा लिलाव
टाईम मॅगझीनची पुन्हा विक्री; सॉफ्टवेअर कंपनी 1,368 कोटींना विकत घेणार
अमेरिका अन् चीनला वादळाचा तडाखा, 60 जणांचा मृत्यू

आणखी वाचा