ट्रम्प यांची कार पाहून अचंबित झाले किम, काय आहे कारची खासियत?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 12:42 PM2018-06-13T12:42:57+5:302018-06-13T12:42:57+5:30

या भेटीआधीपासूनच दोघांबाबतीत वेगवेगळ्या चर्चा झाल्या. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारचाही समावेश आहे. किम जोंग उन हे ट्रम्प यांची आलिशान आणि तितकीच सुरक्षित कार पाहून अचंबित झाले. 

US President Donald Trump meet north Korea leader Kim Jong Un saw Presidential limousine the beast | ट्रम्प यांची कार पाहून अचंबित झाले किम, काय आहे कारची खासियत?

ट्रम्प यांची कार पाहून अचंबित झाले किम, काय आहे कारची खासियत?

Next

सिंगापूर : मंगळवारी सिंगापूरमध्ये साऱ्या जगाचं लक्ष लागलेली महाभेट झाली. ती भेट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची भेट. या दोघांची भेट तब्बल 90 मिनिटे चालली. या भेटीआधीपासूनच दोघांबाबतीत वेगवेगळ्या चर्चा झाल्या. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारचाही समावेश आहे. किम जोंग उन हे ट्रम्प यांची आलिशान आणि तितकीच सुरक्षित कार पाहून अचंबित झाले. 

किम जोंग उन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लिमोजीन कार 'द बीस्ट' आतून पाहिली. दोन्ही नेते कपेला हाऊसमध्ये संवाद झाल्यानंतर गॅलरीमध्ये सहज फेरफटका मारत होते तेव्हा ते आठ टन वजनाची बुलेटप्रुफ लिमोजीनजवळ गेले. 

ट्रम्प यांनीच सीक्रेट सर्व्हिस एंजटला कारचा दरवाजा उघडण्याचा इशारा केला. जेव्हा दोन्ही नेते ऐकमेकांसोबत बोलत उभे होते तेव्हा किम यांनी कारच्या आत वाकून पाहिले. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 'बीस्ट' कार डीटीएसवर आधारित आहे. या कारमध्ये आठ इंच जाड कवच असलेला दरवाजा आणि पाच इंच जाड खिडक्या आहेत. याने कोणत्याही प्रकारच्या रसायन हल्ल्यापासून राष्ट्राध्यक्षांचा बचाव होतो. 

या कारच्या दरवाज्याचं वजन हे बोइंग 757 विमानाइतकं आहे. या कारचे टायर कधीही पंचर होऊ शकत नाही. या टायरला लावण्यात आलेल्या स्टील रिममुळे टायर कधीही खराब होत नाही आणि कारची गतीही कमी होत नाही. ट्रम्प यांच्याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा देश-विदेशात हीच कार वापरत असत.

ही कार सॅटेलाईटसोबत कनेक्टेड असल्याने ट्रम्प नेहमी प्रसासनाच्या संपर्कात राहतात. ही कार ओबामा भारतात आले असताना त्यांनी इथेही आणली होती.

काय आहेत या कारची वैशिष्ट्ये?

- एअरफोर्स वन आणि मरीनप्रमाणे या कारला कॅडियलिक वन असेही म्हटले जाते.

- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी ही कार अधिकृतपणे शेवरलेट कंपनीने तयार केली आहे.

- या कारची किंमत 1.5 मिलियन डॉलर इतकी आहे. तर लांबी 18 फूट आणि रुंदी 5 फूट 10 इंच इतकी आहे. या कारचं वजन आठ टन इतकं आहे. तसेच या कारचा स्पीड 1 सेकंदाज 60 किमी इतका आहे. या कारमध्ये राष्ट्राध्यक्षांसह सात लोकांना बसण्याची जागा आहे. 

- या कारचे टायर अशाप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे की, टायर ब्लास्ट झाले तरी कार सुरक्षित राहू शकते. 
 

Web Title: US President Donald Trump meet north Korea leader Kim Jong Un saw Presidential limousine the beast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.