अमेरिकेतील सरकार पुढील आठवड्यातही ठप्प राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:58 AM2018-12-29T05:58:31+5:302018-12-29T05:59:03+5:30

मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले आहे.

 US government will remain silent next week! | अमेरिकेतील सरकार पुढील आठवड्यातही ठप्प राहणार!

अमेरिकेतील सरकार पुढील आठवड्यातही ठप्प राहणार!

Next

वॉशिंग्टन : मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले असून, यावर तोडगा न निघाल्यामुळे हा पेचप्रसंग दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करणार आहे.
अमेरिकी संसदेच्या सिनेट सभागृहात गुरुवारी केवळ काही मिनिटांचेच काम होऊ शकले. अर्थसंकल्पावर २ जानेवारी रोजी चर्चा करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सभागृहाचे कामकाज संपले. विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीने भिंतीसाठी निधी देण्यास विरोध केला आहेच; पण सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीमधील काही खासदारांनीही भिंतीला निधी देण्यास विरोध केला आहे.

Web Title:  US government will remain silent next week!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.