70 वर्षांनी दक्षिण कोरियाच्या राजधानीतून अमेरिकन सैन्य बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 12:31 PM2018-06-29T12:31:42+5:302018-06-29T12:32:11+5:30

आता या तुकडीचे मुख्यालय दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्या सीमेजवळ नेण्यात य़ेणार आहे

US ends 70 years of military presence in South Korean capital | 70 वर्षांनी दक्षिण कोरियाच्या राजधानीतून अमेरिकन सैन्य बाहेर

70 वर्षांनी दक्षिण कोरियाच्या राजधानीतून अमेरिकन सैन्य बाहेर

सेऊल- दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये आलेले अमेरिकन सैन्य आता अधिकृतरित्या बाहेर पडणार आहे. सलग सात दशके अमेरिकन सैन्य सेऊलमध्ये ठेवण्यात आलेले होते.




आता या तुकडीचे मुख्यालय दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्या सीमेजवळ नेण्यात य़ेणार आहे.  जपानशी लढण्यासाठी अमेरिका 1945मध्ये सेऊलमध्ये सैन्य आणले होते. त्यानंतर सलग सात दशके ते येथएच ठेवण्यात आले. महायुद्धानंतर उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने हे सैन्य तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला.
या सैन्यामुळे अनेक दक्षिण कोरियन लोकांमध्ये अमेरिकेविरोधात भावनाही निर्माण झाली होती. 2008 साली या सैन्याची जागा बदलण्यात येणार होती मात्र अनेकवेळा ते पुढे ढकलण्यात आले. अखेर आता त्याची जागा बदलण्यात येत आहे.



 

Web Title: US ends 70 years of military presence in South Korean capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.