नीरव मोदीला अमेरिकन न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:36 AM2018-03-03T04:36:57+5:302018-03-03T04:36:57+5:30

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल ११ हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला अमेरिकन न्यायालयाने दिलासा दिला आहे.

US court relief to Neeraval Modi | नीरव मोदीला अमेरिकन न्यायालयाचा दिलासा

नीरव मोदीला अमेरिकन न्यायालयाचा दिलासा

Next

वॉशिंग्टन : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल ११ हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला अमेरिकन न्यायालयाने दिलासा दिला आहे. मोदीची मालकी असलेल्या फायरस्टार डायमंड कंपनीकडून देणेक-यांना कर्जवसुली करण्यास न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
फायरस्टार डायमंड आणि सहयोगी कंपन्यांची मालकी नीरव मोदीकडे आहे. या कंपन्यांनी अनेकांकडून कर्ज घेतले होते. मात्र, भारतात पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड झाल्यानंतर अनेकांनी आपले पैसे परत मिळविण्यासाठी नीरव मोदीकडे तगादा लावला.
तर, काहींनी थेट न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे नीरव मोदीच्या कंपनीनेही अमेरिकेतील नादारी कायद्यांतर्गत संरक्षण मिळावे म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीदरम्यान न्यू यॉर्कमधील विषेश न्यायालयाने मोदीला दिलासा देत कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश दिला.
>‘ठिकाणा माहीत नाही’
नीरव मोदीला अमेरिकन न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर मोदी अमेरिकतच असल्याची चर्चा सुरू झाली. अमेरिकन प्रशासनाने मात्र नीरव मोदीचा ठावठिकाणा सांगण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

Web Title: US court relief to Neeraval Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.