us california bar shooting people injured | अमेरिकेत गोळीबार, 11 जणांचा मृत्यू
अमेरिकेत गोळीबार, 11 जणांचा मृत्यू

कॅलिफोर्निया- अमेरिकेतल्या दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये अज्ञातानं गोळीबार केला आहे. या गोळाबारात आतापर्यंत अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरानं सेमी ऑटोमॅटिक गननं हल्ल केला असून, अनेकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 

हल्लेखोरात जखमी लोकांमध्ये एका पोलीस अधिका-याचा समावेश आहे. कॅलिफोर्नियाची स्थानिक वृत्तसंस्था वेंचुरा कंट्री स्टारच्या मते, बॉर्डरलाइन बार अँड ग्रिल नावाच्या पबमध्ये बुधवारी गोळीबार केला. वेंचुरा कंट्री स्टारच्या एका रिपोर्टरच्या माहितीनुसार घटनास्थळी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन(एफबीआय)चे अधिकारी दाखल झाले असून, ते तपास करत आहेत. वेंचुरा कंट्री स्टारच्या रिपोर्टरनं एक व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये लोक सैरावैरा पळत असल्याचं पाहायला मिळतंय. 


Web Title: us california bar shooting people injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.