United States : फ्लोरिडात रेस्टॉरंटमध्ये गोळीबार, तीन जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 07:45 AM2018-08-27T07:45:27+5:302018-08-27T07:47:47+5:30

अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात जॅक्सनवील परिसरामध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

United States: firing in Florida restaurant, three deaths | United States : फ्लोरिडात रेस्टॉरंटमध्ये गोळीबार, तीन जणांचा मृत्यू 

United States : फ्लोरिडात रेस्टॉरंटमध्ये गोळीबार, तीन जणांचा मृत्यू 

वॉशिंग्टन - अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात जॅक्सनवील परिसरामध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले आहेत. फ्लोरिडातील जॅक्सनवील लँडिंग परिसातील एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गर्दीवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी जेक्सनवीलकडे येणारे मार्ग बंद केले असून, हल्लेखोरांपैकी एकाला घटनास्थळावरच ठार करण्यात आले. 





 यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  जॅक्सनवीलमध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या एका हल्लेखोराला घटनास्थळी ठार मागण्यात आले आहे. तर अन्य एकाचा शोध सुरू आहे. या गोळीबारानंतर पोलिसांकडून बचाव आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र दुसरा संशयित घटनास्थळी आहे की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
 
पोलिसांनी गोळीबाराची घटना घडल्यानंतर लँडिंग एरियाजवळ जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. तसेच स्थानिकांच्य मदतीसाठी एक क्रमांक प्रसिद्ध केल आहे. तसेच पोलिसांनी एक शोधमोहीम हाती घेतली असून, स्थानिक रहिवाशांना संपूर्ण सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.  

Web Title: United States: firing in Florida restaurant, three deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.