तणाव निवळण्यासाठी मध्यस्थी करा, पाकिस्तानची यूनो आणि रशियाला विनवणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 12:43 PM2019-03-01T12:43:14+5:302019-03-01T12:44:30+5:30

भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे.

UN General Secretary and Russia to play a mediation role to de-escalate tensions in South Asia - Pakistan | तणाव निवळण्यासाठी मध्यस्थी करा, पाकिस्तानची यूनो आणि रशियाला विनवणी 

तणाव निवळण्यासाठी मध्यस्थी करा, पाकिस्तानची यूनो आणि रशियाला विनवणी 

ठळक मुद्देदक्षिण आशियामधील तणाव निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी तसेच रशियाने मध्यस्थी करावीपाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांचे आवाहन

इस्लामाबाद - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दील घुसून या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मद्दच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राइक केले होते. दरम्यान, भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे. त्यामुळेच दक्षिण आशियामधील तणाव निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी तसेच रशियाने मध्यस्थी करावी, अशी विनवणी पाकिस्तानने केली आहे. 

दक्षिण आशियामधील तणाव निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि रशियाने मध्यस्थी करावी, असे आवाहन पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी केले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची भाषा करत भारतासमोर चर्चेसाठी हात पुढे केला होता. 




भारतील हवाई दलाने जैश ए मोहम्मदच्या बालाकोट येथील केलेल्या तळावर एअर स्ट्राइक करून हा तळ उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भारताकडून रणनीतिक आणि कुटनीतिक स्तरावर वाढवण्यात येणाऱ्या दबावामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोदींनी त्याला प्रतिसाद दिला नाही.   

Web Title: UN General Secretary and Russia to play a mediation role to de-escalate tensions in South Asia - Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.