PUBG खेळण्यापासून रोखल्यानं नात्याचा कडेलोट; पत्नीनं मागितला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 11:43 AM2019-05-03T11:43:10+5:302019-05-03T12:23:26+5:30

जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. PUBG हा गेम खेळू न दिल्याने एका पत्नीने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची घटना समोर आली आहे.

UAE man stops wife from playing PUBG. She files for divorce | PUBG खेळण्यापासून रोखल्यानं नात्याचा कडेलोट; पत्नीनं मागितला घटस्फोट

PUBG खेळण्यापासून रोखल्यानं नात्याचा कडेलोट; पत्नीनं मागितला घटस्फोट

googlenewsNext
ठळक मुद्देPUBG हा गेम खेळू न दिल्याने एका पत्नीने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची घटना समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे ही घटना घडली आहे. पत्नीला खेळापासून रोखून तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची नसून कुटुंब एकत्र राहावं म्हणून विरोध केल्याचं स्पष्टीकरण पतीने दिलं आहे. 

पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. PUBG हा गेम खेळू न दिल्याने एका पत्नीने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची घटना समोर आली आहे. अजमल पोलिसांच्या सामाजिक केंद्राचे संचालक, कॅप्टन वफा खलील हे हा खटला चालवत आहेत. संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे ही घटना घडली आहे. 

गल्फ न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने मनोरंजनासाठी तिला पब्जी खेळण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. मात्र तिला तिच्या या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे घटस्फोट हवा असल्याचं पत्नीने म्हटलं आहे. तसेच महिलेने नातेवाईकांशी पब्जी गेम खेळत असल्याची माहिती दिली आहे. तर पतीने पत्नीचा पब्जी खेळण्याचा वेळ वाढत जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच ती या गेमच्या जास्त आहारी जात असल्याने तिचे घराकडे दुर्लक्ष होत असल्याने तिला खेळण्यापासून रोखल्याची माहिती पतीने दिली आहे. तसेच पत्नीला खेळापासून रोखून तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची नसून कुटुंब एकत्र राहावं म्हणून विरोध केल्याचं स्पष्टीकरण पतीने दिलं आहे. 

PUBG चं वेड जिवाशी खेळ; एका विद्यार्थ्याची आत्महत्या

PUBG मुळे एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील मलकानगिरी जिल्ह्यात ही घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, परिक्षेच्या काळात हा विद्यार्थी सतत PUBG गेम खेळत होता. मुलाला असलेल्या पबजीच्या वेडामुळे आई-वडील हैराण झाले होते. त्यांनी अनेकदा मुलाला समजावले व दहावीचे वर्ष असल्यामुळे अभ्यास करण्याचा सल्ला दिला. मात्र तरीही मुलगा अभ्यास न करता दिवसभर पबजी खेळण्यात व्यस्त असल्याने ते त्याला ओरडले. पालकांच्या ओरडण्यामुळे नाराज झालेल्या मुलाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. 

Hyderabad: Scolded for playing PUBG, Class X student commits suicide | PUBG चं वेड जिवाशी खेळ; एका विद्यार्थ्याची आत्महत्या

'तो' सलग 45 दिवस PUBG खेळला, अन्...

पबजी खेळण्याची सवय काही दिवसांपूर्वी एका तरुणाच्या जीवावर बेतली होती. सलग 45 दिवस पबजी खेळल्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. सतत पबजी खेळल्यामुळे मान सुजून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. तेलंगाणातील जगतियाल या शहरात सलग 45 दिवस पबजी खेळल्याने तरुणाचा मृत्यू झाला होता. सतत गेम खेळत असल्याने तरुणाला मान वळवताही येत नव्हती. मानेला सूज आल्यामुळे त्याच्या मानेत वेदना सुरू झाल्या होत्या. उपचारासाठी या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

PUBG गेम आता फक्त सहा तासच खेळता येणार?

पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात फक्त सहा तासच हा खेळ खेळता येणार आहे. गुजरातमधील सूरत आणि राजकोटमध्ये पबजी खेळण्यावर बंदी आहे. यासंबंधीचे परिपत्रक पोलिसांनी सोशल मीडियावरून जारी केले होते. तसेच सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना गुजरातमध्ये पोलिसांनी अटक केली होती. पबजी या खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

PUBG Mobile addiction: Teenager steals Rs 50,000 from his father

PUBG खेळणं पडलं महागात, 10 जणांना अटक

काही दिवसांपूर्वी राजकोटमध्ये पबजी खेळणं काही लोकांना महागात पडलं होतं. गुजरात सरकारने परीक्षेच्या काळात पबजी खेळण्यावर बंदी घातली आहे. मोबाईलवर पबजी खेळून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना गुजरातमध्ये पोलिसांनीअटक केली होती. पबजीवर परिक्षेच्या काळात म्हणजेच 9 मार्चपासून बंदी घालण्यात आली असून 30 एप्रिलपर्यंत ही बंदी राहणार आहे. राजकोट पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांना अटक केली होती. 

पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अ‍ॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी 1 ते 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.

Web Title: UAE man stops wife from playing PUBG. She files for divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.