'टायगर जिंदा है'?; खेळण्यातील वाघामुळे स्कॉटलंड पोलिसांचे झाले हसे

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 10:41am

घटनास्थळी पोलीस आणि श्वानांची विशेष पथकेही पाठवण्यात आली.

एडिनबर्ग: आपल्याकडे अनेकदा सामन्य लोक सुरक्षा यंत्रणांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांचा दाखला देतात. मात्र, स्कॉटलंडमध्ये नुकत्याच घडलेल्या एका प्रकारामुळे ही सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे.  स्कॉटलंडच्या ईशान्येकडील एका शेतात हा सर्व प्रकार घडला. गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री येथील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात एक वाघ बसलेला दिसला. हे बघून शेतकरी प्रचंड घाबरला. त्याने लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. थोड्याचवेळात पोलीस घटनास्थळी हजरही झाले. मात्र, साधारण पाऊण तासानंतर जेव्हा सगळ्याचा उलगडा झाला तेव्हा पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.   पोलिसांनी याठिकाणी आल्यानंतर शेतात बसलेल्या वाघाचे फोटो कंट्रोल रूमला पाठवले. तेव्हा एका तज्ज्ञाने हा खरा वाघ असल्याचे सांगितले. त्यामुळे कंट्रोल रूमकडून अनुचित प्रसंग उद्भवल्यास वाघाचा सामना करण्यासाठी घटनास्थळी पोलीस आणि श्वानांची विशेष पथकेही पाठवण्यात आली. यादरम्यान वाघाचे पोट भरल्यामुळे तो बहुधा शांत बसून आहे, फक्त अधूनमधून त्याचे कान हलताना दिसत आहेत, अशी माहिती कंट्रोल रूमला दिली जात होती. मात्र, पाऊणतासाने पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने शेतातील तो वाघ खरा नसून खेळण्यातील असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. तेव्हा सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला. वाघ खरा आहे किंवा नाही हे समजायला पाऊणतास कसा काय लागू शकतो, असे अनेक सवाल नेटिझन्सकडून उपस्थित करण्यात आले. अनेकांनी यावरून पोलिसांची खिल्ली उडवत मजेशीर ट्विटस केली.  यानंतर स्कॉटलंडच्या ईशान्य विभागाच्या पोलिसांनी सारवासारव करताना फेसबुकवरून या सगळ्या प्रकाराची माहिती दिली. सुमारे 45 मिनिटे हा प्रकार सुरू होता. शेवटी नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. तो वाघ खोटा होता, याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही या सगळ्याकडे सकारात्मक पद्धतीने बघतो, असे पोलिसांनी म्हटले. मात्र, तोपर्यंत पोलिसांची व्हायची ती नाचक्की झालीच होती. 

संबंधित

चंद्रपूर जिल्ह्यातील हळदा-बोडधा रस्त्यावर वाघाचा सहा तास डेरा
महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत तब्बल ५५ वाघ आणि २६३ बिबट्यांचा मृत्यू
लैंगिक जीवन : 'ही' पद्धत वापरणं प्रायव्हेट पार्टसाठी पडू शकते महागात!
वाघ आणि बकरीची जगप्रसिद्ध मैत्री तुटणार, लोकांचा विरोध!
काळजाला भिडणारा 'सेल्फी', बोमन इराणींचे लाईक, 'बिग बीं'ची कमेंट तर सिद्धार्थ बसूंचा शेअर

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला दुबईत बेड्या 
१०० वर्षात प्रथमच समोर आला दुर्मिळ आफ्रिकन काळ्या बिबट्याचा फोटो
हजाराच्या माळेत उडवून दिला iPhone, बघा मग काय झालं...
पाकिस्तानला चीनचा दे धक्का; विमानवाहू नौका देण्यास नकार
एकच नंबर! झाडं लावण्यात भारत, चीन अव्वल

आणखी वाचा