या आहेत पाकिस्तानातील दहा सुंदर महिला राजकारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 07:18 AM2017-11-10T07:18:32+5:302017-11-10T07:19:10+5:30

मुस्लीम देशांमध्ये महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने असल्याच्या बातम्या आपण रोज ऐकत असतो. पाकिस्तान मात्र त्याला अपवाद आहे. पाकिस्तानामध्ये महिलांवर एवढ्या अधिक प्रमाणामध्ये बंधने नाहीत.

These are the ten beautiful women politicians in Pakistan | या आहेत पाकिस्तानातील दहा सुंदर महिला राजकारणी

या आहेत पाकिस्तानातील दहा सुंदर महिला राजकारणी

googlenewsNext

मुस्लीम देशांमध्ये महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने असल्याच्या बातम्या आपण रोज ऐकत असतो. पाकिस्तान मात्र त्याला अपवाद आहे. पाकिस्तानामध्ये महिलांवर एवढ्या अधिक प्रमाणामध्ये बंधने नाहीत. जगभरातील मुस्लीम देशांच्या तुलनेत पाकिस्तानातील महिला अधिक स्वतंत्र असल्याचे पाहायला मिळते. सौंदर्याकरिता  प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानातील अनेक मॉडेल बाहेर देशात जाऊन नाव कमवितात. आजच्या घडीला पाकिस्तानातील महिलांनी देशातील विविध क्षेत्रांमध्ये स्थान मिळवून आपला ठसा उमटवला आहे. 

राजकारण, शिक्षण, आर्थिक क्षेत्र, सेवा, आरोग्य आणि अशा सर्वच क्षेत्रांत महिलांचा दबदबा पाहायला मिळतो. विशेषतः राजकारणामध्ये महिलांनी अधिक लक्ष वेधले आहे. त्यातही तरुणींनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळाध्ये अनेक नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. गेल्या निवडणुकीत असे अनेक चेहरे पाहायला मिळाले. पाकिस्तानातील अशाच 10 आकर्षक महिला राजकारण्यांबाबत आज आम्ही माहिती देणार आहोत. 
 

मरयम नवाज -
सर्वांत सुंदर महिलांच्या यादित माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरयम नवाज शरीफ पहिल्या क्रमांकावर येतात. पाकिस्तानमधील राष्ट्रीय राजकारणात त्या सक्रीय आहेत. 2013 मध्ये प्रधानमंत्री विकास योजनेचा तिला प्रमुख करण्यात आले होते परंतु त्यानंतर पाकिस्तानी हायकोर्टनि तिची नियुक्ती अवैद्य ठरवली आणि तिला राजीनामा द्यावा लागला.

आयला मलिक -
पाकिस्तानचे माजी संघिय मंत्री सुमायरा मलिक यांची बहिण आयला मलिक या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षासाठी त्या काम करतात. आयला ही राजकारणासोबत सक्रीय पत्रकार सुध्दा आहे. सन 2002 ते 2007 पर्यत ती पाकिस्तानी लोकसभा सदस्य होती. 2013 साली तिचे पद खोट्या पदवीकरिता खारीज करण्यात आले.

हिना रब्बानी खार -
या सर्वांत कमी वयाच्या आणि पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री राहिल्या आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टीसोबत जुळलेल्या हिना रब्बानी खान फॅशनेबल आऊटफिट घालण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गळ्यातील मोत्याची माळ, बॅग आणि सनग्लासेस मुळे ती नेहमी चर्चेत राहते. 

कश्माला तारिक -
कश्मला ही सुरवातीस मानवी अधिकाराकरिता लढणारी एक बुलंद आवाज होती त्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला. कश्मला तरीक या पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीच्या सदस्य आहे. पाकिस्तानातील महिलांसाठी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्या करतात. पाकिस्तान मुस्लीम लीग (कैद ए आझम) साठी त्या काम करतात. तसेच पाकिस्तानात महिला हक्कांसाठीही लढतात. कश्मलादेखिल ड्रेस आणि बोल्ड स्टेटमेंट्ससाठी प्रसिद्ध आहेत.  

मारवी मेमन -
राष्ट्रीय मुद्द्यांवर रोख ठोक मते मांडण्यासाठी मारवी प्रसिद्ध आहे. 2008 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या मार्वी सर्वांत कमी वयाच्या लोकप्रतिनिधी होत्या. पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख आणि उद्योजक निसार मेमन यांची ती मुलगी आहे. तिने पहिले अनेक राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय वृत्त संस्थेकरिता काम केलेले आहे.

सासुई पलीजो -
सासुई पालिजो यादेखिल पाकिस्तानातील तरुण आणि स्वतंत्र विचारसरणी असलेल्या राजकीय नेत्या आणि त्याचबरोबर प्रसिद्ध स्तंभलेखिकाही आहेत. त्यांना ससी पलीयो या नावानेही ओळखले जाते. पाकिस्तान पिपल्स पार्टीसाठी काम करणाऱ्या पलीओ सिंधी आहेत. त्या सिंध प्रांतातील पहिल्या महिला आहे ज्या सर्वसामान्य जागेवरून निवडणूक लढवून निवडून आलेल्या आहे. 

सुमैरा मलिक -
सुमैरा या पाकिस्तानातील प्रसिद्ध राजकारणी, सामाजिक कार्यकर्त्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत.  साहित्यात मास्टर असलेल्या सुमायरा सध्या लोकसभा सदस्य आहे. महिला बालकल्याणचे मंत्री पदही उपभोगले आहे. माजी राष्ट्रपती सरदार फारूक खान लघारी हे त्यांचे काका होते. 

शाझिया मारी -
शिझिया या बलुचिस्तान प्रांतातील राजकारणी आणि नॅशनल असेंबलीच्या सदस्य आहेत. त्या सिंध प्रांतातील माहिती आणि ऊर्जा क्षेत्राच्या मंत्रीही होत्या. पाकिस्तानी पिपल पार्टीच्या त्या सदस्य आहे. तिचे जन्म ठिकाण कराची आहे. BA मध्ये पदवी घेतलेल्या शाजीया आज एक प्रभावी आवाज आहे. 2002 मध्ये त्या सर्वात आधी निवडून आल्या होत्या.

हिना परवेज भट्ट या पेशानं फॅशन डिझायनर आहेत. फॅशन डिझायनिंगसह त्यांनी राजकारणातही सक्रिय आहेत. पाकिस्तानातील तरुण पिढीसाठी त्या एक आदर्श आहेत. हिना सध्या पाकिस्तानातील खासदार आहेत.

अलिझेह इक्बाल हैदर - 

बेनझीर भुट्टोपासून त्या प्रेरित होऊन राजकारणात आल्या.  पाकिस्तान पीपप्ल पार्टीच्या सदस्य असून या पक्षाच्या महिला विंगसाठी काम करतात. 
 

 

Web Title: These are the ten beautiful women politicians in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.