There was a fire in the news anchor and he got up and ran from studio | न्यूज अँकरच्या अंगावर पडला आगीचा गोळा अन् तो उठून पळाला
न्यूज अँकरच्या अंगावर पडला आगीचा गोळा अन् तो उठून पळाला

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पत्रकार आणि न्यूज चॅनेल अनेकदा हास्याचा विषय बनत असतात. यापूर्वीही पाकिस्तानमधील पत्रकार चाँद नवाब सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर, बजरंगी भाईजान या चित्रपटातही विनोदी पत्रकार चाँद नवाबचे कॅरेक्टर घेण्यात आले होते. आता, येथील एका न्यूज स्टुडिओमध्ये अँकरच्या अंगावर चक्क आगीचा गोळा पडल्याची घटना घडली आहे. 

पाकिस्तानमध्ये एका न्यूज चॅनेलवर चर्चासत्र सुरु होते. त्यावेळी न्यूज अँकर पॅनलमधील उपस्थितांना प्रश्न विचारत होता. मात्र, अचानक आगीचा गोळा अँकरच्या अंगावर येऊन पडल्याने तो स्टुडिओ सोडून घाबरुन पळाला. त्यावेळी चर्चासत्रासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांनाही हा प्रकार नेमका काय हे लक्षात आले नाही. नैला निलायत या पत्रकाराने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यावर, अनेकांनी मजेशीर कमेंट दिल्या असून काहींनी तर दहशवाद्यांचं बॉम्ब टेस्टींग सुरू होतं, असेही म्हटले आहे. 
दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार आणि न्यूज चॅनेल नेहमीच काही तरी चुकांमुळे चर्चेत असतात. यापूर्वीही इम्रान खान चीनमधील 'Beijing’ येथून लाईव्ह संवाद साधत होते. त्यावेळी, एका न्यूज चॅनेलने from Begging असे लिहिले होते.   Web Title: There was a fire in the news anchor and he got up and ran from studio
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.