भारताकडून कोणताही धोका नाही, अमेरिकेचं पाकिस्तानला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 08:27 PM2018-01-16T20:27:04+5:302018-01-16T20:27:11+5:30

अमेरिकेनं दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत पाकिस्तानला देऊ केलेल्या मदतीवर टाच आणली. त्यानंतर आता अमेरिकेनं पाकिस्तानला भारताकडून कोणताही धोका नसल्याचं आश्वासन दिलं आहे.

There is no threat to India, Pakistan's assurance to Pakistan | भारताकडून कोणताही धोका नाही, अमेरिकेचं पाकिस्तानला आश्वासन

भारताकडून कोणताही धोका नाही, अमेरिकेचं पाकिस्तानला आश्वासन

इस्लामाबाद- अमेरिकेनं दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत पाकिस्तानला देऊ केलेल्या मदतीवर टाच आणली. त्यानंतर आता अमेरिकेनं पाकिस्तानला भारताकडून कोणताही धोका नसल्याचं आश्वासन दिलं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर खान असे म्हणाले आहेत. तसेच पाकिस्ताननं भारताबाबतच्या स्वतःच्या रणनीतीत सकारात्मक बदल करायला हवा, असंही अमेरिकेचं मत आहे. पाकिस्ताननं अमेरिकेशी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असं विधान खुर्रम दस्तगीर खान यांनी केलं आहे. कठोर भूमिका सोडून टेबलावर सर्व प्रकरणं ठेवून ती समोपचारानं सोडवण्याची गरज आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिकेमधील गैरसमज दूर होतील, असंही खुर्रम दस्तगीर खान यांनी स्पष्ट केलं आहे. 

दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकने पाकिस्तानला दणका दिला होता. पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली होती. 

'पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यांसारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकी नागरिकांना इजा पोहोचवणाऱ्या घटकांविरोधात निर्णायक कारवाई करणार नाही, तोपर्यंत अमेरिका पाकिस्तानला कोणतेही सुरक्षा सहाय्य पुरवणार नाही. या अंतर्गत ट्रम्प सरकार पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवू शकते. मात्र, रक्कम सरकारला अन्य ठिकाणी वळवता येणार नाही. जेणेकरून परिस्थिती सुधारल्यानंतर या निधीचा पुन्हा वापर करता येईल', असेही हीथर नोर्ट यांनी सांगितले.
अमेरिकेनं दिला होता इशारा
व्हाइट हाउसच्या प्रसारमाध्यम सचिव साराह सँडर्स यांनी सांगितले की, दहशतवादी कारवाया थांबविण्यासाठी पाकने आणखी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे पाकवर दबाव वाढविण्यासाठी अमेरिका आणखी निर्बंध लादणार आहे. गेल्या पंधरा वर्षांत अमेरिकेने पाकला केलेली ३३ अब्ज डॉलरची मदत हा मूर्खपणा होता. या काळात पाक मात्र अमेरिकेशी खोटेपणाने व कपटी वृत्तीने वागला, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. अमेरिकेने पाकची २५५ दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत रोखली आहे.  

Web Title: There is no threat to India, Pakistan's assurance to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.