या झाडाला घाबरले होते इसिसचे दहशतवादी, भीतीने कापले झाड 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 08:48 PM2017-08-16T20:48:34+5:302017-08-16T20:50:14+5:30

आपल्या क्रूर कारवायांनी जगभरात दहशत पसरवणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्यांनी इराक आणि सीरियामध्ये हिंसाचार माजवला आहे. या दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी स्थानिक सुरक्षा यंत्रणा आणि अमेरिकेसह इतर देशांकडून मोहीम सुरू आहे.

The terrorists of this tree were afraid of it, the trees cut in fear |  या झाडाला घाबरले होते इसिसचे दहशतवादी, भीतीने कापले झाड 

 या झाडाला घाबरले होते इसिसचे दहशतवादी, भीतीने कापले झाड 

Next

दमिश्क, दि. 16 - आपल्या क्रूर कारवायांनी जगभरात दहशत पसरवणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्यांनी इराक आणि सीरियामध्ये हिंसाचार माजवला आहे. या दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी स्थानिक सुरक्षा यंत्रणा आणि अमेरिकेसह इतर देशांकडून मोहीम सुरू आहे. याचदरम्यान इसिसचे क्रूर दहशतवादी एका झाडाला घाबरत असल्याची माहिती समोर आली आहे. या भीतीपोटी सदर दहशतवाद्यांनी हे झाड मुळापासून कापून टाकले.  यासंदर्भातील छायाचित्रे प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये इसिसचे दहशतवादी एक झाड कापताना दिसत आहे. 
या झाडाचा आकार पाहिल्यानंतर सहर झाडाची लोकांकडून पूजा करण्यात येऊ शकते, अशी भीती इसिसच्या दहशतवाद्यांना वाटत होती. दरम्यान, इसिसशी संबंधित असलेल्या खालिद बिन वालिद संघटनेच्या दहशतवाद्यांनी हे झाड तोडून टाकले. प्रसारित झालेल्या छायाचित्रांमध्ये काही दहशतवादी हे झाड मुळापासून तोडून टाकताना दिसत आहेत. डेली मेलने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. या झाडामुळे बहुदेवता परंपरेला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती या संघटनेला वाटत होती, असे होणे इस्लामच्या विचारांच्या विरोधात असल्याने त्यांनी हे कृत्य केले, असे या वृत्तात म्हटले आहे.  
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी याआधीही इस्लामिक परंपरेच्या विरोधी ठरवून इराक आणि सीरियामधील अनेक पुरातन वास्तू पाडल्या आहेत.  तसेच या संघटनेच्या क्रूर नियमांनुसार अल्ला वगळता अन्य कुणाची पूजा करणे हे इस्लामविरोधी असून, त्याची शिक्षा मृत्युदंड ही निश्चित करण्यात आली आहे.  

इसिसनं याआधी उडवली मोसुलमधील प्रसिद्ध नूरी मस्जिद
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (ISIS) मोसुलमधील प्रसिद्ध अल-नूरी मस्जिद गेल्या महिन्यात स्फोट घडवून उडवली होती.  ISIS नेता अबू बकर अल बगदादी 2014 मध्ये या मस्जिदच्या माध्यमातून पहिल्यांदा लोकांसमोर आला होता व त्यानं आपल्या खिलाफतची घोषणा केली होती.  दरम्यान, ही मस्जिद अमेरिकेच्या एका लढाऊ विमानाच्या हल्ल्यात नष्ट झाली, असा दावा इसिसनं असा दावा केला होता. तर दुसरीकडे अमेरिकेनं हा दावा फेटाळून लावला होता. 
काय आहे अल-नूरी मस्जिदचे वैशिष्ट्य ?
- इसिस आणि त्याविरोधात लढणारे पक्ष  यासाठी मस्जिदचे विशेष असे महत्त्व आहे 
- इसिस नेता अबू बकल अल बगदादीनं जुलै 2014 मध्ये येथे एक सभा घेऊन नवीन इस्लामिक राज्य स्थापित करण्याची घोषणा केली होती
- या घोषणेच्या आठ आठवड्यांनंतर मोसुल शहरावर इसिसनं कब्जा केला होता
- 1172 मध्ये मोसुल आणि अलेपोवर शासन करणारा नूर अल दीन महमूद जांगीनं ही मस्जिद निर्माण करण्यासाठी आदेश दिला होता. 
- नूर अल दीन महमूद जांगीच्या नावावरुनच मस्जिदचे नाव ठेवण्यात आले होते
 

Web Title: The terrorists of this tree were afraid of it, the trees cut in fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.