पाकिस्तान हा असा शेजारी जो दहशतवादाबरोबर नाकारण्यातही माहीर : सुषमा स्वराज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 08:24 PM2018-09-29T20:24:59+5:302018-09-29T20:53:39+5:30

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजनांच्या यशस्वीतेचा आढावा घेतला.

terrorist attacks ruined the expectations of peace : Sushma Swaraj | पाकिस्तान हा असा शेजारी जो दहशतवादाबरोबर नाकारण्यातही माहीर : सुषमा स्वराज

पाकिस्तान हा असा शेजारी जो दहशतवादाबरोबर नाकारण्यातही माहीर : सुषमा स्वराज

googlenewsNext

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाच्या भुमिकेवर सडकून टीका केली. पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरविण्याबरोबरच त्याला नाकारण्याचेही कसब मिळविले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असून 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड उघड माथ्याने हिंडत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजनांच्या यशस्वीतेचा आढावा घेतला. जन धन योजनेमुळे भ्रष्टाचार कमी झाला, 32 कोटी लोकांनी बँकांमध्ये खाती उघडल्याचे सांगतानाच वातावरणातील बदल आणि दहशतवाद या मोठ्या समस्या बनल्या असल्याचे त्यांनी सांगितले.



 

9/11 चा न्युयॉर्कवरील हल्ला  आणि 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांनी शांततेच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. भारत दहशवादामुळे त्रस्त असून शेजारील देशच याला खतपाणी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या कृत्यांमुळे शांतता चर्चा खंडीत झाली आहे. 



 

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता. भारतही तयार होता. मात्र, पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण एकाची हत्या केली. यामुळे भारताने पाकिस्तानला नकार दिल्याचे, सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. 




वातावरण बदलाचा विकसित देशांपेक्षा छोट्या छोट्या आणि विकसनशील देशांना मोठा फटका बसत आहे. कारण या देशांकडे आपत्तींशी लढण्यासाठी साधने नाहीत. यामुळे विकास साधलेल्या देशांनी निसर्गाची मोठी हानी केली आहे. ते आपल्या जबाबदारीपासून मागे फिरू शकत नाहीत. या देशांनी छोट्या छोट्या देशांना मदत करायला हवी, असे आवाहन स्वराज यांनी केले. इंडोनेशियाला भुकंपाचा धक्का बसल्यानंतर त्सुनामीने हाहाकार माजवला आहे. भारत त्यांच्या सोबत आहे, असेही स्वराज म्हणाल्या. 

Web Title: terrorist attacks ruined the expectations of peace : Sushma Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.