मेक्सिकोमध्ये भयावह भूकंप, २५0 हून अधिक जण ठार : कोट्यवधींची आर्थिक हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:12 AM2017-09-21T04:12:15+5:302017-09-21T04:12:17+5:30

मेक्सिकोमध्ये मंगळवारी झालेल्या भयावह भूकंपाने २१ शाळकरी मुलांसह २५० हून अधिक जणांचे बळी घेतले असून, प्रचंड आर्थिक हानीही घडवून आणली आहे.

A terrible earthquake in Mexico, more than 250 people killed: millions of financial losses | मेक्सिकोमध्ये भयावह भूकंप, २५0 हून अधिक जण ठार : कोट्यवधींची आर्थिक हानी

मेक्सिकोमध्ये भयावह भूकंप, २५0 हून अधिक जण ठार : कोट्यवधींची आर्थिक हानी

Next

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये मंगळवारी झालेल्या भयावह भूकंपाने २१ शाळकरी मुलांसह २५० हून अधिक जणांचे बळी घेतले असून, प्रचंड आर्थिक हानीही घडवून आणली आहे. या ७.१ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाच्या तडाख्याने अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. इमारतींच्या ढिगाºयांखाली अनेक जण अडकून पडले आहेत.
मेक्सिकोतील एन्रिक रेबासमेन प्राथमिक शाळेतील दृश्य हृदय गोठवणारे होते. या शाळेच्या इमारतीचे तीन मजले डोळ्यांच्या पापण्या लवण्याच्या हात भुईसपाट झाले. त्यात २१ विद्यार्थी मरण पावले. याशिवाय मेक्सिकोतील अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या काही क्षणातच कोसळल्या. इमारतींच्या ढिगाºयाखाली अनेक जण अडकले असून, मदत व बचाव पथके ढिगारे उपसून त्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. भूकंपाची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मेक्सिको सिटीबरोबरच प्युएब्ला, मॉरेलॉस, मेक्सिको
स्टेट आणि गुएर्रेरो येथे जीवितहानी झाली. अचानक इमारती हादरू लागल्याने अनेकांनी जीव मुठीत
धरून मोकळ्या सुरक्षित जागी धाव घेतली. (वृत्तसंस्था)
>जगभरातून मदत
मेक्सिको सिटीवर कोसळेल्या या भयंकर आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जगभरातून मदतीसाठी हात पुढे आले असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाच्या पंतप्रधानांनी मदत देऊ करून संकटकाळात आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत मेक्सिको सिटीवासीयांना धीर दिला. भूकंपामुळे इमारती कोसळताना, आतच्या गॅस सिलिंडर्समुळे तसेच विजेच्या उपकरणांमुळे स्फोट झाले आणि कोसळणाºया इमारती जळतच खाली आल्या. त्या आगींमुळेही काही जण होरपळून मरण पावले. मेक्सिकोमध्ये १९८५ मध्ये याच दिवशी आलेल्या भयानक विध्वसंकारी भूकंप झाला होता. त्यावेळी १० हजार लोक मृत्युमुखी पडले होते. या विध्वंसक भूंकपाच्या आठवणी मेक्सिकोवासीयांच्या मनी कायम असताना मंगळवारी १९ सप्टेंबरच्या रात्री भूकंपाने मेक्सिको सिटी हादरली. मंगळवारच्या भूकंपाआधी १२ दिवसांपूर्वी दक्षिणेकडील दोन प्रांतांत आलेल्या भूकंपात १०० जण ठार, तर दोनशेहून अधिक जखमी झाले होते.

Web Title: A terrible earthquake in Mexico, more than 250 people killed: millions of financial losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.