काबूलमध्ये एनडीएस सैन्यावर आत्मघाती हल्ला, 10 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 09:31 AM2018-07-26T09:31:15+5:302018-07-26T09:31:59+5:30

अफगाणिस्तानच्या काबूलमधील बग ई दाऊद परिसरातील एनडीएस सैन्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Suicide attack in NDS army in Kabul, killing 10 people | काबूलमध्ये एनडीएस सैन्यावर आत्मघाती हल्ला, 10 जणांचा मृत्यू 

काबूलमध्ये एनडीएस सैन्यावर आत्मघाती हल्ला, 10 जणांचा मृत्यू 

Next

काबूल - अफगाणिस्तानच्या काबूलमधील बग ई दाऊद परिसरातील एनडीएस सैन्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. आत्मघातील हल्लेखोरांकडून येथील एनडीएस फोर्सेसला लक्ष्य करण्यात आले. काबूल पोलीस विभागाचे प्रवक्ते हशमत स्टेनकझाई यांनी याबाबत माहिती दिली.

तालिबानकडून या हल्ल्याची जबाबदारी स्विकारण्यात आली असून काबूल पोलीस आणि लष्कराकडून घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून मदतकार्य सुरु आहे.

सविस्तर वृत्त लवकरच....

Web Title: Suicide attack in NDS army in Kabul, killing 10 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.