ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 9 - पाकिस्तानने पहिल्यांदाच पाणबुडीतून मारा करणा-या क्रूझ क्षेपणास्त्र बाबर-3 ची यशस्वी चाचणी घेतली आहे.  बाबर-3 ची मारक क्षमता 450 कि.मी.पर्यंत इतकी आहे. हिंद महासागरमधील गुप्त ठिकाणाहून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आलं होतं व त्याने अचूक लक्ष्य साधलं असा दावा पाकिस्तानने केला आहे. 
 
पाकिस्तानचे  इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक(ISPR)   मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.  बाबर-3 मुळे पाकिस्तानच्या अणू हल्ल्याचं उत्तर देण्याच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे.  
 
यापुर्वी भारतानेही 2008 मध्ये पाणबुडीतून अणू हल्ला करणा-या मिसाईलचं तर 2013 मध्ये क्रूझ मिसाईलचं यशस्वी परिक्षण केलं होतं. याशिवाय काही दिवसांपूर्वी भारताने अग्नि-4 आणि अग्नि-5 चं यशस्वी परिक्षण केलं होतं.