स्वित्झर्लंड उभारणार श्रीदेवीचा पुतळा; बॉलीवूडचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 04:09 AM2018-09-09T04:09:01+5:302018-09-09T04:09:23+5:30

आल्प्स पर्वतराजीच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवरील बॉलीवूडमधील नृत्यगीतांनी भारतीयांसाठी स्वित्झर्लंड हे पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण बनविण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिचा स्वित्झर्लंडमध्ये पुतळा उभारण्यात येणार आहे.

Sridevi statue to be set up in Switzerland; Bollywood Pride | स्वित्झर्लंड उभारणार श्रीदेवीचा पुतळा; बॉलीवूडचे कौतुक

स्वित्झर्लंड उभारणार श्रीदेवीचा पुतळा; बॉलीवूडचे कौतुक

googlenewsNext

बर्न : आल्प्स पर्वतराजीच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवरील बॉलीवूडमधील नृत्यगीतांनी भारतीयांसाठी स्वित्झर्लंड हे पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण बनविण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिचा स्वित्झर्लंडमध्ये पुतळा उभारण्यात येणार आहे. श्रीदेवीच्या ‘चांदनी’ या गजलेल्या चित्रपटातील बहुतेक सर्व गाण्यांचे चित्रीकरण स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले होते.
या आधी स्वित्झर्लंडच्या पर्यटन उद्योगाने असाच मान बॉलीवूडचे चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनाही दिला असून इटरलाकेन शहरात त्यांचा पुतळा उभारण्याखेरीज सन २०११ मध्ये त्यांना त्या शहराचे मानद राजदूत म्हणूनही बहुमान देण्यात आला.
सन १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला राजकपूर यांना ‘संगम’ हा स्वित्झर्लंडमध्ये चित्रीकरण झालेला बॉलीवूडचा पहिला चित्रपट ठरला होता. लगोलग सन १९६७ च्या ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’चे बहुतांश चित्रिकरणही स्वित्झर्लंडमध्येच
केले गेले होते. त्यानंतर, सुमारे दोन दशके स्वित्झर्लंडमध्ये जाऊन चित्रिकरण करण्याची बॉलीवूडच्या निर्मात्यांमध्ये एकप्रकारे चढाओढ लागली होती.
‘डीडीएलजे’ चा करिश्मा
असेच चित्रीकरण असलेल्या आदित्य चोप्रा यांच्या १९९५ मधील ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (डीडीएलजे) या चित्रपटाने लोकप्रियतेचा कळस गाठला होता.
रूपेरी पडद्यावरील स्वित्झर्लंड प्रत्यक्ष पाहण्याची प्रबळ इच्छा
भारतातील श्रीमंत व मध्यमवर्गीयांमध्ये जागृत झाली व त्याने त्या
देशातील पर्यंटनास मोठी चालना मिळाली. गेल्या वर्षी तब्बल ३.२६ लाख भारतीय स्वित्झर्लंडला पर्यटक म्हणून गेले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Sridevi statue to be set up in Switzerland; Bollywood Pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.