सोमालिया पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं, 14 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 10:40 AM2017-10-29T10:40:20+5:302017-10-29T10:41:06+5:30

मोगादिशू- सोमालियातल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर एका संशयित कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16हून अधिक जण जखमी आहे.

Somalia blasted again, 14 people were killed and 16 others injured | सोमालिया पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं, 14 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

सोमालिया पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं, 14 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

googlenewsNext

मोगादिशू- सोमालियातल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर एका संशयित कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16हून अधिक जण जखमी आहे. या बॉम्बस्फोटानंतर परिसरात दुस-या एका ठिकाणीही गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पहिला बॉम्बस्फोटात दहशतवाद्यानं स्वतःला उडवून घेतलं. तर राष्ट्रपती निवासाजवळ असलेल्या नासा-हब्लोद हॉटेलच्या वरच्या मजल्यावर दहशतवादी लपून बसले असून, सुरक्षा दलाच्या जवानांशी त्यांची चकमक सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी कॅप्टन मोहम्मद हुसैन यांनी दिली आहे.




पहिल्या मजल्यावर पाचमधील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नासा- हब्लोद हॉटेलच्या आतून गोळीबाराचा आवाज येत आहे, अशी माहितीही त्या अधिका-यानं दिली आहे. या बॉम्बस्फोटाच्या दोन आठवड्यांआधी मोगादिशूमध्ये ट्रक बॉम्बचा स्फोट झाला होता. ज्यात 350हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये हा सर्वात शक्तीशाली स्फोट घडवून आणला होता. एका हॉटेल आणि बाजाराच्या बाहेर झालेल्या स्फोटात 350 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 300 लोक जखमी होते. गेल्या तीन दशकातील हा सर्वात शक्तीशाली स्फोट असल्याचं बोललं जातं आहे. हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून 100 ते 150 मीटरच्या परिघात उपस्थित असलेले नागरिकही मृत्युमुखी पडले.

सोमालियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्बसाठा ठेवून तो एका गजबजलेल्या रस्त्यावर सोडण्यात आला.
सोमालियाचे नेते अब्दीरहमान उस्मान यांनी या घटनेला अतिभयंकर असं म्हटलं आहे. तुर्की आणि केनियासह अनेक देशांतून जखमींवर उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र मंत्रालयासह महत्त्वपूर्ण मंत्रालयाच्या जवळील रस्त्यांवर निशाणा साधत हा ट्रक बॉम्ब स्फोट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली होती.
स्फोट झालेल्या ठिकाणी संतप्त नागरिकांनी गर्दी केली होती. तर सोमालिया सरकारने या स्फोटाला राष्ट्रीय संकट जाहीर केलं आहे. अल-कायदाशी संबंधित समूह अल-शबाबला या स्फोटासाठी सरकारने जबाबदार ठरवलं आहे. आफ्रिकेतील या घातक समूहाने याआधी अनेक वेळा राजधानी मोगादिशूमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर निशाणा साधला होता. पण आत्तापर्यंत या स्फोटाबाबतील या समूहाने कुठलीही माहिती दिलेली नाही.

Web Title: Somalia blasted again, 14 people were killed and 16 others injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट