बीजिंग - वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी उर्जेचा वाढलेला बेसुमार वापर यांनी गेल्या काही काळात गंभीर रूप धारण केले आहे.  वाढती लोकसंख्या आणि वाढलेला उर्जेचा वापर येत्या काळात पृथ्वीचे अस्तिव धोक्यात आणणार आहे.  सातत्याने वाढत असलेली लोकसंख्या आणि उर्जेच्या वाढत्या वापरामुळे इ.स. 2600 पर्यंत पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचून तिचे आगीच्या गोळ्यात रूपांतर होईल, अशी भीती महान भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केली आहे. तसेच हा विनाश टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे. हे शक्य नसेल तर मानवाला आणखी काही लाख वर्षे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अन्य ग्रहावार जावे लागेल, असे  मत त्यांनी मांडले. 
बीजिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी परिषदेला संबोधित करताना हॉकिंग म्हणाले," गेल्या काही काळापासून जगाची लोकसंख्या आणि उर्जेच्या वाढत्या वापरामुळे आम्ही आपल्या पृथ्वीला आगीच्या गोळ्यामध्ये बदलण्याच्या दिशेने नेत आहोत. मोठ्या प्रमाणात उर्जेची निर्मिती होत असल्याने पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. त्याचा फटका मानव जातीला बसणार आहे."
दरम्यान, मानवाला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर राहण्यायोग्य अन्य ग्रहाचा शोध घ्यावा लागेल. असा सल्लाही हॉकिंग यांनी दिला."शास्त्रज्ञांनी सौरमालिकेबाहेर अशा एका ग्रहाचा शोध घेतला पाहिजे जिथे ग्रहांचे भ्रमण हे मानवास राहण्यासाठी योग्य असेल. त्यादृष्टीने सेनटॉरी नावाच्या एका ग्रहाचा उल्लेख केला जो मानवी वस्तीसाठी योग्य आहे. पण तो चार लाख प्रकाश वर्षे दूर आहे. त्यामुळे अशा दूर वसलेल्या ग्रहावर जाण्यासाठी शास्त्रज्ञांना एका असे एअरक्राफ्ट बनवावे लागेल जे प्रकाशाच्या वेगाने उड्डाण करेल. आपल्याला एक असे यंत्र बनवावे लागेल जे तासाभरात मंगळावर, एका दिवसात फ्लूटोपर्यंत, एका आठवड्यात वेयेगरपर्यत आणि सेनटॉरीपर्यंत किमान 20 वर्षांत पोहोचेल."  


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.