न्यू यॉर्क - आजपर्यंत मी कधीही अल्कोहोल घेतलेलं नाही किंवा सिगरेटलाही मी कधी हात लावलेला नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.  व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान ट्रम्प यांनी आपल्या मोठ्या भावाची आठवण सांगितली.  

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा भाऊ फ्रेड ट्रम्प. त्यांचा वयाच्या केवळ 43 व्या वर्षी दारुच्या आहारी गेल्यामुळे मृत्यू झाला होता. आपल्या मोठ्या भावाबाबत बोलताना ट्रम्प भावुक झाले होते. माझा भाऊ फ्रेड हा ग्रेट माणूस होता, माझ्यापेक्षा तो खूपच चांगला होता. पण त्याची एक समस्या होती. त्याला दारूचं व्यसन होतं.  

तो माझ्यापेक्षा मोठा होता त्यामुळे मी त्याचा खूप आदर करायचो. त्याचं सर्व म्हणणं ऐकायचो. दारू पिऊ नकोस, कधी सिगरेटही पिऊ नकोस असं तो मला सातत्याने सांगायचा.‘तो खूप खंबीर होता, पण तो ज्या परिस्थितीतून गेला, ती कठीण होती. मी फ्रेडकडून खूप काही शिकलो’ असं सांगताना ट्रम्प यांना भावना अनावर झाल्या.  त्यामुळे आजपर्यंत मी कधी दारू किंवा सिगरेटला हातही लावलेला नाही असं ट्रम्प म्हणाले. 

आजपर्यंत मी कधीही दारू किंवा सिगरेटला हातही लावलेला नाही. मला तशी इच्छाही नाही. सुदैवाने मला मार्गदर्शक होता. माझं ऐका, मद्यपानामुळे त्याचं आयुष्य खूप म्हणजे खूप यातनादायी गेलं.’ असं ट्रम्प म्हणाले.  


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.