अमेरिकेत घुसणाऱ्यांवर गोळ्या घाला; ट्रम्प यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 09:55 AM2018-11-02T09:55:54+5:302018-11-02T09:56:31+5:30

वॉशिंग्टन : रोजगार आणि चांगल्या आयुष्याच्या शोधात लॅटीन अमेरिकेतील देश होंडुरास, ग्वाटेमाल आणि अल सल्वाडोर या देशांतून जवळपास 10 ...

Shoot the infiltrators in America; Trump order | अमेरिकेत घुसणाऱ्यांवर गोळ्या घाला; ट्रम्प यांचे आदेश

अमेरिकेत घुसणाऱ्यांवर गोळ्या घाला; ट्रम्प यांचे आदेश

वॉशिंग्टन : रोजगार आणि चांगल्या आयुष्याच्या शोधात लॅटीन अमेरिकेतील देश होंडुरास, ग्वाटेमाल आणि अल सल्वाडोर या देशांतून जवळपास 10 हजार लोक अमेरिकेच्या वाटेवर असून त्यांना रोखण्यासाठी ट्रम्प यांनी थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. 


मेक्सिकोच्या सीमेवर अमेरिकेने 15 हजार सैनिक तैनात केले आहेत. या स्थलांतर करणाऱ्या लोकांनी दगडफेक केल्यास त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात येणार आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, सैन्य आधी गोळ्या झाडणार नाही. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करेल. मात्र, मेक्सिकोसारखी दगडफेक केल्यास मग त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात येतील. दगडफेक आणि गोळ्या झाडण्यामध्ये काही फरक नसल्याचेही त्यांनी सांगितले.  


तीन दिवसांपूर्वी अमेरिकेत घुसणाय़ऱ्या एका जथ्थ्याने सैन्यावर दगडफेक केली होती. यामुळे बरेच सैनिक जखमी झाले होते. सध्या मेक्सिकोच्या सीमेवर 2100 राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांसह 5800 सैनिक तैनात आहेत. आज आणखी 10 हजार सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. या मोहिमेला ऑपरेशन विश्वासू देशभक्त असे नाव देण्यात आले आहे.

Web Title: Shoot the infiltrators in America; Trump order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.