#Shocking : खाली कोसळणाऱ्या विमानाचं दृष्य पाहून तुम्हाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 08:11 PM2017-11-23T20:11:01+5:302017-11-24T11:56:03+5:30

विमानाच्या अपघाताच्या बातम्या ऐकल्या की अंगावर काटा उभा राहतो. या विमानाचा अपघातही तसाच काळजाचा ठोका चुकवणारा होता.

#Shocking: terrific video of crashing plane | #Shocking : खाली कोसळणाऱ्या विमानाचं दृष्य पाहून तुम्हाला बसेल धक्का

#Shocking : खाली कोसळणाऱ्या विमानाचं दृष्य पाहून तुम्हाला बसेल धक्का

ठळक मुद्देहे विमान आधीच काही अंतर उडून आलं होतं मग अचानक त्याला काय झालं असावं हा प्रश्न अनुत्तरीत आहे.इंजिनात बिघाड झाल्याने विमान गंचागळ्या खाऊ लागलं आणि तसंच जाऊन झाडांवर आदळलं.विमानाची अवस्था खराब झाली असली तरीही पायलट आणि सहकारी सुखरूप आहेत.

फ्लोरिडा : फ्लोरिडातील क्लीअरवॉटर एअरपार्कमधून उडालेलं विमान धाडकन खाली कोसळल्याची घटना नुकतीच घडली. या विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने विमानाला उडण्यात अडथळे येत होते. हायवेपासून अगदी जवळूनच हे विमान उडत असल्याचे पाहून येथील ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी सावध पवित्रा घेत हा सगळा थरार त्यांच्या व्हॅनमधील डॅश कॅमेऱ्यात कैद केला. अचानकपणे रस्त्यावर क्रॅश झालेलं विमान पाहून हायवेवरील इतर प्रवासीही अचंबित झालेत.

रविवारी फ्लोरिडातील पिनलास काऊंटी येथे दोन पोलीस कार्यरत होते. तेव्हा त्यांनी चकीत करणारी गोष्ट पाहिली. हायवेवरून एक विमान खतरनाक पद्धतीने उडत होतं, त्यानंतर हे विमान धाडकन खाली कोसळलं. पायलट मार्क एलेन बेनेडिक्ट आणि प्रवासी ग्रेगरी गिनी याचं एकल इंजिन रॉकवेल इंटरनॅशनल एअरक्राफ्ट हे विमान क्लीअरवॉटर एअरपार्क येथून ८० किलोमीटर लांब असलेल्या जेफिरहिल्स म्यूनिसिपल एअरपोर्ट इथं घेऊन गेले होते. जेफिरहिल्स म्यूनिसिपल विमानतळावर इंधन भरल्यावर हे विमान पुन्हा क्लीअरवॉटर एअरपार्क इथे जाण्यासाठी रवाना झालं.

पण काहीच अंतरावर गेल्यावर या विमानाला उडण्यास अडथळे येऊ लागले. या विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने पायलटलाही विमानावर नियंत्रण ठेवण्यास कठीण जात होतं. हे विमान योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही असं समजल्यावर त्यांनी विमानाला इथंच उतरवायचं ठरवलं. पण त्याआधीच या विमानाने अनेक झाडांना टक्कर दिली. पायलट विमानाचं लँडिंग करणार तोपर्यंत विमानाच्या डाव्या बाजूचे पंखही तुटून खाली पडले आणि विमानही धाडकन खाली कोसळलं. या अपघातात पायलट आणि सहकारी केवळ किरकोळ जखमी झाले आहेत. पिनलास काउंटी शेरिफ ऑफिसच्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 

हा थरार पाहून सारेच चक्रावले होते. विमानाचा अशाप्रकारे अपघात होईल असं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. विमान जर जेफिरहिल्स म्यूनिसिपल एअरपोर्टपर्यंत व्यवस्थित जाऊ शकतं तर पुन्हा येताना यात कसा काय बिघाड होऊ शकतो असा प्रश्न पायलट आणि सहकाऱ्यांना पडला. या विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाल्याने विमानाला उडण्यास अडथळे येत होते. याच अडथळ्यांतून पायलटने विमान उडवलं खरं पण हे विमान योग्यस्थळी पोहोचेल की नाही याची त्यांना खात्री नव्हती. म्हणून विमान उतरवण्यात येणार होतं. मात्र विमानाने त्याआधीच विमान खाली कोसळलं. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झालेली नाही. 

सौजन्य - www.ndtv.com

Web Title: #Shocking: terrific video of crashing plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.