धक्कादायक! विक्षिप्त परिचारकाने केली 106 रुणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 8:08pm

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देवदूताची उपमा दिली जाते. पण या क्षेत्रामध्येही काही विकृतीही वावरत असतात. अशीच एक धक्का देणारी घटना...

 बर्लिन - वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देवदूताची उपमा दिली जाते. पण या क्षेत्रामध्येही काही विकृतीही वावरत असतात. अशीच एक धक्का देणारी घटना जर्मनीमध्ये उघडकीस आली आहे. जर्मनीमध्ये औषधांचे अधिक डोस देऊन एका परिचारकाने (ब्रदर) 106 रुग्णांचा जीव घेतल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, अजून काही मृतदेहांची तपासणी सुरू असल्याने या प्रकारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती तपासकर्त्यांनी व्यक्त केली आहे.  नील्स होजेल नामक 41 वर्षीय परिचारकाला 2015 साली केलेल्या दोन हत्यांच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तसेच होजेलवर उत्तरी ब्रोमेनमधील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या चार रुग्णांच्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी ऑगस्ट महिन्यांत सांगितले होते की, होजेलने सुमारे 90 रुग्णांची हत्या केली आहे. या हत्यांपैकी बहुतांश प्रकरणांची चौकशी पूर्ण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच होजेलला 16 हत्यांप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. 1999 पासून 2005 पर्यंत होजेल दोन स्थानिक रुग्णालयांमध्ये परिचारक होता. याचदरम्यान त्याने या हत्या केल्या.    ओल्डेनबर्गमध्ये सरकारी पक्षाने सांगितले की, पुढील वर्षी होजेल याच्यावर अजून काही आरोप ठेवण्यात येणार आहेत. होजेल हा रुग्णाना जाणूनबुजून औषधांचा अधिक डोस देत असे. ज्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा झटका येत असे वा त्यांच्या शरीरातील एकेक अवयव निकामी होत असत. कहर म्हणजे यानंतर तो त्या रुग्णांवर उपचार करायचा आणि त्यातून  एकादा रुग्ण वाचलाच तर वरिष्ठांकडून त्याचे कौतुक होऊन नावलौकिक व्हायचा.   जर्मनीच्या इतिहासामधील ही एक विचित्र घटना आहे. होजेलच्या या कृत्यामुळे चिंताजनक परिस्थितीमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांला स्वास्थ लाभावे अशी प्रार्थना पोलिसांनी केली आहे. तसेच होजेलला आपण औषधांचा अतिरिक्त डोस किती रुग्णांना दिला हे माहित नाही. मात्र असे 30 वेळा घडल्याचे त्याने सांगितल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांनी सांगितले आहे.  

संबंधित

जन्मापूर्वीच १८२ बाळांचा मृत्यू
जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची ३०१ पदे रिक्त
हिंगोलीत भूमिगत गटार योजनेच्या कामाने घेतला बालकाचा बळी
धक्कादायक ! सांगली 'सिव्हिल'मध्ये जिवंत रुग्णाला ठरविले मृत
'तो' ललीतकुमार माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर रुजू

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिकांचा दावा
अमेरिकेत १०० भारतीय घुसखोरांची तुरुंगात रवानगी
सौदी अरेबिया करणार चमत्कार, कतार देशाचे बेटामध्ये रुपांतर करणार
सायनाइडचा वापर करुन नवऱ्याला मारणाऱ्या पत्नीस शिक्षा, प्रियकरालाही कारावास
चीनची रेल्वे येणार काठमांडूमध्ये, दोन्ही देशांची जवळीक वाढली

आणखी वाचा