जपानच्या पंतप्रधानपदी शिंझो अबेंची फेरनिवड, जास्त काळ राहणारे पंतप्रधान बनणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:17 AM2017-11-02T03:17:58+5:302017-11-02T03:18:34+5:30

Shinzo Abe's re-election as Japan's Prime Minister, will be the long-term prime minister | जपानच्या पंतप्रधानपदी शिंझो अबेंची फेरनिवड, जास्त काळ राहणारे पंतप्रधान बनणार

जपानच्या पंतप्रधानपदी शिंझो अबेंची फेरनिवड, जास्त काळ राहणारे पंतप्रधान बनणार

Next

टोक्यो : जपानच्या संसदेने बुधवारी शिंझो अबे यांची पंतप्रधानपदी औपचारिकरीत्या फेरनिवड केली. अबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटीक पक्षाने २२ आॅक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत दोन तृतीयांश (सुपर मेजॉरिटी) विजय मिळवल्यामुळे अबे हे देशाचे सर्वात जास्त काळ राहणारे पंतप्रधान बनणार आहेत.
अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाकडून मिळत असलेल्या धमक्या आणि घटता जन्मदर या दोन मोठ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज असल्याचे अबे यांनी प्रचारात सांगितले होते. ४६५ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात अबे यांच्या पक्षाने ३१२ जागा जिंकल्या होत्या तर २४२ सदस्यांच्या वरिष्ठ सभागृहात अबे यांच्या पक्षाने १५१ मते जिंकून बहुमत प्राप्त केले.

Web Title: Shinzo Abe's re-election as Japan's Prime Minister, will be the long-term prime minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.