मेंढीही ओळखू शकते बराऽऽऽक ओबामांना, केंब्रिज विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 8:40pm

लंडन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना जगभरात ओळखले जाते ते त्यांच्या खास शैलीमुळे. बराक यांना ओळखण्यात मेंढी या प्राण्याची भर पडली आहे.

लंडन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना जगभरात ओळखले जाते ते त्यांच्या खास शैलीमुळे. बराक यांना ओळखण्यात मेंढी या प्राण्याची भर पडली आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी एका प्रयोगातून बुधवारी हा दावा केला. केंब्रिजच्या संशोधक जगभरात समस्या बनत चाललेल्या स्मृतिभ्रंश आणि मानसिक आजाराबाबत अभ्यास करत आहेत. यासाठी त्यांनी मेंढी या प्राण्यावर प्रयोग केले. मेंढ्या ज्या कळपात तसेच व्यक्तींच्या सहवासात असतात त्या त्यांना त्या त्यांच्या चेह-यावरून ओळखतात. हा अभ्यास करण्यासाठी संशोधकांच्या चमूने बराक ओबामा, हॅरी पॉटर आणि प्रख्यात अभिनेत्री इमा वॉटसन आदींच्या छायाचित्रांचा उपयोग केला. काही दिवसांतच मेंढी या चेह-याशी ‘फॅमीलीयर’ झाली व छायाचित्र ओळखू लागली, असा दावा प्रमुख संशोधक जेनी मॉर्टन यांनी केला. मनुष्य आणि माकडांपेक्षाही चेहरे ओळखण्याची क्षमता मेंढीमध्ये असते, असाही या चमूने निष्कर्ष काढला. रॉयल सोसायटीच्या ओपन सायन्समध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

संबंधित

धोक्याची घंटा! पावणेदोन कोटी लोकांना कर्करोग होण्याची शक्यता
सायबर हल्ल्यांमुळे जर्मन उद्योगाला तब्बल ५० अब्ज डॉलरचा फटका
Ganesh Chaturthi 2018 : थायलंडमध्येही 'गणपती बाप्पा मोरया', जाणून घ्या येथील बाप्पांचे नाव
कॅलिफोर्नियात पाच जणांची हत्या करुन हल्लेखोराची आत्महत्या
हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा'वरील बंदी हटविली

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

आणखी वाचा