डोनाल्ड ट्रम्पनी ड्रेसिंग रुममध्ये लैंगिक शोषण केले; लेखिकेचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 07:48 PM2019-06-22T19:48:54+5:302019-06-22T19:49:46+5:30

ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित असल्यापासून वादात सापडले आहेत.

sexually abused in the dressing room by Donald Trump; Writer's serious charges | डोनाल्ड ट्रम्पनी ड्रेसिंग रुममध्ये लैंगिक शोषण केले; लेखिकेचे गंभीर आरोप

डोनाल्ड ट्रम्पनी ड्रेसिंग रुममध्ये लैंगिक शोषण केले; लेखिकेचे गंभीर आरोप

Next

वॉशिंग्टन : एल्ले फॅशन मॅगझिनच्या प्रसिद्ध लेखिका ई जेन कॅरोल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नव्वदच्या दशकात न्यूयॉर्कच्या एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ट्रम्पनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप कॅरोल यांनी केला आहे. यामुळे ट्रम्प पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. 


ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित असल्यापासून वादात सापडले आहेत. त्यांच्यावर योग प्रशिक्षक महिलेपासून अगदी हाऊसकिपींग करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. आता त्यामध्ये लेखिकेची भर पडलेली आहे. 


कॅरोल यांनी सांगितले की, माझ्यावर ट्रम्प यांनी बलात्कार केला. ही घटना 1995-96 च्या काळात घडली होती. जेव्हा आम्ही दोघे मॅनहटनच्या एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये खरेदी करत होतो, तेव्हा ही घटना घडली. ट्रम्प तेव्हा प्रसिद्ध रिअल इस्टेट विकासक होते. मी तेव्हा एक टीव्ही शो करत होते. 


स्टोअरमध्ये ट्रम्प यांनी आपल्याशी चांगले वर्तन करत एका महिलेसाठी अंतवस्त्र खरेदी करण्याच्या बहाण्याने विचारले. जेव्हा ड्रेसिंग रुमचा दरवाजा बंद होता तेव्हा त्यांनी भिंतीच्या बाजुला ढकलले. यावेळी माझ्या डोक्याला मार लागाला आणि त्यानंतर त्यांनी किस करत काढता पाय घेतला. तेव्हा मी पोलिसांकडे गेली नाही, कारण घाबरली होती. कोणीतरी मला ठार मारेल अशी भीती वाटत होती, असे कॅरोल यांनी सांगितले. 
या पूर्ण घटनेचा खुलासा कॅरोल यांच्या पुस्तकात केला आहे. न्यूयॉर्क मैगजीनने या बाबत शुक्रवारी लेख लिहिला आहे. यामध्ये कॅरोल या 16 व्या महिला आहेत, ज्यांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. 


या आरोपांवर ट्रम्प यांनी मी या महिलेला कधीच भेटलेलो नाही. ती तिचे नवे पुस्तक विकण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून तिचा हेतू स्पष्ट होतो, असे स्पष्ट केले आहे. 


ट्रम्प आणि लैंगिक शोषणाचे आरोप...
ट्रम्प यांच्यावर ऑक्टोबर 2016मध्ये योगासन प्रशिक्षिका असलेल्या कॅरेना यांनी ट्रम्प यांनी 1998 सालात त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप केला होता. तर अमेरिकन अभिनेत्री, उद्योजिका आणि वक्ता असलेल्या जेनिफरनेही 2005 मध्ये ट्रम्प यांच्याकडे नोकरीसाठी मुलाखत दिल्यानंतर ट्रम्प यांनी जबरदस्तीने तिचं चुंबन घेतलं होतं, असा आरोप केला आहे. ट्रम्प यांच्या रिअल इस्टेट कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या रशेल क्रुक्स या तरुणीची लिफ्टमध्ये अचानक ट्रम्प यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी हस्तांदोलन केल्यानंतर ट्रम्प यांनी तिच्या गालांचं चुंबन घेतलं होतं. लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असूनही ट्रम्प यांनी हे कृत्य केल्याचा आरोप रशेल यांनी केला होता.2013 सालची मिस वॉशिंग्टन ठरलेल्या कॅसेन्ड्रा हिने ट्रम्प यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. तसेच हॉटेलमध्ये बोलावल्याचेही तिने सांगितले होते. 

Web Title: sexually abused in the dressing room by Donald Trump; Writer's serious charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.