वॉशिंग्टन - इन्स्टाग्रामवर जर 40 लाख फॉलोअर्स असतील, तर काहीही पोस्ट करण्याआधी थोडा विचार नक्कीच करावा लागतो. कारण पोस्ट केलेली कोणतीही गोष्ट थोड्याच वेळात लाखो लोकांपर्यंत पोहोतच असते. अनेकदा बेसावधान राहिल्यामुळे आपली खासगी माहितीदेखील फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. अमेरिकेतील एका तरुणीसोबत असंच काहीसं झालं आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना चुकून तिच्याकडून या खासगी क्षणांचं इन्स्टाग्रावर लाइव्ह स्ट्रिमिंग झालं.

आपली चूक लक्षात येताच तरुणीने ती पोस्ट डिलीट करुन टाकली. लाइव्ह स्ट्रिमिंग होत असताना फोनचा कॅमेरा त्यांच्या दिशेने नसल्याने तरुणीला तेवढा दिलासा मिळाला. तिच्या फॉलोअर्सला फक्त दोघांचा आवाज ऐकू जात होता. 

क्रिस्टन हँचर असं या तरुणीचं नाव आहे. इन्स्टाग्राम सेलिब्रिटी असलेल्या क्रिस्टन हँचरकडून सेक्स करत असताना चुकून लाइव्ह स्ट्रिमिंग ऑप्शन सुरु झालं आणि तिच्या लाखो फॉलोअर्सपैकी 14 हजार फॉलोअर्सनी ही तीन मिनिटांची ऑडिओ क्लिप ऐकली. यानंतर क्रिस्टन हँचरने ही ऑडिओ क्लिप डिलीट करत हे चुकून झालं असून, तुमच्या डोक्यातून हे काढून टाका असं सांगितलं. 

पार्कच्या बेंचवर दांपत्य करत होतं सेक्स
इंटरनेटवर सध्या एका दांपत्याचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दांपत्य पार्कमधील बेंचवर सेक्स करताना दिसत आहे. दांपत्यावर सार्वजनिक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांना दोन हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला जाऊ शकतो. सोबतच एक वर्षाच्या कारावासाचीही शिक्षा होण्याची शक्यता आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना अमेरिकेतील इलिनोए येथील आहे. हे दांपत्य नेमकं कोठून आलं होतं, किंवा कुठे राहतं याबाद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत हे दांपत्य बिनधास्तपणे पार्कात सेक्स करत असल्याचं दिसत आहे. यावेळी तिथे उपस्थित एका व्यक्तीने हे कृत्य कॅमे-यात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन टाकला. विशेष म्हणजे, जेव्हा ती व्यक्ती दांपत्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होती, तेव्हा महिलेने त्याला पाहिलेलं आहे. यावेळी ती त्याच्याकडे पाहून हसत होती. यानंतर महिला व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्यासाठी व्यक्तीला सुनावते. मी माझ्या पतीसोबत आहे असं सांगतानाही ती दिसत आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.