ऑनलाइन लोकमत

रियाध, दि. २३ - सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू युवराज सलमान यांची त्यांचे वारसदार म्हणून घोषणा करण्यात आले आहे, असे राजघराण्याकडून वृत्तसंस्थाना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू युवराज सलमान यांची त्यांचे वारसदार म्हणून घोषणा करण्यात आली आहे, मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला यांना न्युमोनिया झाला होता व ते रुग्णालयात उपचार घेत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अब्दुल्ला २००५ साली  सौदी अरेबियाचे राजे म्हणून सत्तारूढ झाले. अमेरिकेच्या अल कायदाविरोधातील लढाईत अब्दुल्ला यांनी सहभाग घेतला होता. देशात महत्वपूर्ण सुधारणा घडवून आणणा-या अनेक  कार्यक्रमांना त्यांनी प्रोत्साहन दिले. तसेच निवडणुकीदरम्यान महिलांना मतदानाचा अधिकारही मिळवून दिला.