S-400 करार :CAATSA निर्बंधांबाबतचा निर्णय भारताला लवकरच कळेल, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 09:00 AM2018-10-11T09:00:19+5:302018-10-11T09:00:46+5:30

काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट (CAATSA) अंतर्गत घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारताला लवकरच माहिती कळेल, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

S-400 Agreement: India will soon find out USA sanctions- Donald Trump | S-400 करार :CAATSA निर्बंधांबाबतचा निर्णय भारताला लवकरच कळेल, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

S-400 करार :CAATSA निर्बंधांबाबतचा निर्णय भारताला लवकरच कळेल, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

googlenewsNext

वॉशिंग्टन - अमेरिकेने केलेला विरोध डावलून भारतानेरशियासोबत S-400  मिसाईल डिफेन्स सिस्टीमसाठी करार केला होता. दरम्यान, हा करार झाल्यापासून अमेरिकेकडून भारतावर निर्बंध घालण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट (CAATSA) अंतर्गत घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारताला लवकरच माहिती कळेल, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

रशियासोबत संरक्षण सामुग्रि करार करणाऱ्या भारताला CAATSA अंतर्गत भारताला सूट देण्याचा अधिकार केवळ ट्रम्प यांच्याकडे आहे. भारताने रशियासोबत केलेल्या या कराराबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले की, " अमेरिकेचा विरोध डावलून रशियासोबत करार करणाऱ्या भारताला CAATSA अंतर्गत घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत लवकरच माहिती मिळेल. तुम्ही पाहालच, तसेच इराणकडून होणारी तेलखरेदी थांबवण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या 4 नोव्हेंबरच्या डेडलाइननंतरही तेलाची आयात करणाऱ्या देशांनाही अमेरिका पाहून घेईल, "असा सज्जड दमही ट्रम्प यांनी दिला. सध्या इराणकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध घालण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असताना भारत आणि चीनसारखे मोठे देश इराणकडून तेलखरेदी करत आहेत.

अमेरिकन प्रशानसनात गेल्या काही दिवसांमध्ये बदललेली राजकीय समीकरणे आणि भारताच्या व्यापार शुल्क धोरणांबाबत अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक मत पाहता रशियासोबत केलेल्या S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम करारानंतर भारताला  CAATSA निर्बंधांमधून सूट मिळणे कठीण असल्याचे मत संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.   

काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ?

एस-400 ही जगातील अत्याधुनिकमिसाईल डिफेन्स सिस्टीम असून, या प्रणालीमध्ये शत्रूची विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचं सामर्थ्य आहे.  एस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्याती जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. ही प्रणाली शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम आहे.  ही प्रणाली रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक रुप आहे. 
अल्माज आंटे या शास्त्रज्ञाने ही प्रणाली विकसित केली होती. तसेच 2007 पासून एस 400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम रशियाच्या सेवेत आहे. एकाच वेळी 36 वार करण्याची क्षमता हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.  

Web Title: S-400 Agreement: India will soon find out USA sanctions- Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.