'Rahul-Rahul' announcement at airport; Rahul Gandhi visits the UAE | VIDEO : दुबई विमानतळावर 'राहुल-राहुल' च्या घोषणा; राहुल गांधी UAE च्या दौऱ्यावर
VIDEO : दुबई विमानतळावर 'राहुल-राहुल' च्या घोषणा; राहुल गांधी UAE च्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर आहोत. दुबईतमधील विमानतळावर मोठ्या उत्साहात राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळावर उपस्थितांनी 'राहुल-राहुल' अशी घोषणाबाजी केली. 

दुबई आणि अबु धाबीमधील दौऱ्यात राहुल गांधी येथील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. तसेच, येथील विद्यार्थी आणि उद्योगपतींशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांचा या वर्षातील पहिलाच हा विदेश दौरा आहे. त्यांच्यासोबत, सॅम पित्रोदा आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी सुद्धा दुबईत आहेत.  

दरम्यान, काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा दुबई दौरा राजकीय नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुबईमध्ये असणाऱ्या भारतीयांना येणाऱ्या अडचणी राहुल गांधी या दौऱ्यात ऐकून येणार आहेत. तसेच, येथील भारतीयांच्या समस्या संसदेत मांडणार आहेत.   
 

English summary :
Congress President Rahul Gandhi is on a two-day visit to Dubai. Rahul Gandhi was welcomed with great enthusiasm at the Dubai airport. At this time the airport attendants shouted 'Rahul-Rahul'.Rahul Gandhi will address the Indian community in Dubai and Abu Dhabi.


Web Title: 'Rahul-Rahul' announcement at airport; Rahul Gandhi visits the UAE
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.