लंडनमधील उच्चायुक्तालयाबाहेर भारतसमर्थक व विरोधक यांचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:36 AM2018-01-28T01:36:41+5:302018-01-28T01:37:26+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचे विरोधक व समर्थक यांच्यात जोरदार चकमक झडली. विरोधकांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान भारताचा ध्वज फाडून पायदळी तुडविण्यात आला. दोन्ही बाजूंनी अवमानकारक घोषणाबाजी करण्यात आली.

 Rada of anti-India and opponent outside London's High Commission | लंडनमधील उच्चायुक्तालयाबाहेर भारतसमर्थक व विरोधक यांचा राडा

लंडनमधील उच्चायुक्तालयाबाहेर भारतसमर्थक व विरोधक यांचा राडा

googlenewsNext

लंडन : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचे विरोधक व समर्थक यांच्यात जोरदार चकमक झडली. विरोधकांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान भारताचा ध्वज फाडून पायदळी तुडविण्यात आला. दोन्ही बाजूंनी अवमानकारक घोषणाबाजी करण्यात आली.
मात्र, संयुक्त राष्टÑांत भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संयुक्त राष्टÑांच्या पाच कायम सदस्यांपैकी रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन यांचे राजदूत कार्यक्रमाला उपस्थित होते. पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी समारंभाला उपस्थित राहून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वॉशिंटन येथील भारतीय दूतावासात अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेजसिंग सरना यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
दर प्रजासत्ताक दिनी भारतविरोधी गट लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर दरवर्षी निदर्शने करतो. हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळला जातो. ब्रिटिश संसदेचा असंलग्न सदस्य लॉर्ड नजीर अहमद याने यंदाही असेच आंदोलन आयोजित केले होते. त्यावेळी भारतीय ध्वजाची विटंबणा करण्यात आली.
दुसºया दिवशी नजीरने पुन्हा आगळीक केली. ‘काश्मीर मुक्त करा’, ‘खलिस्तान मुक्त करा’, ‘नागालँड मुक्त करा’ आणि ‘मणिपूर मुक्त करा’ अशा घोषणा असलेल्या पाच व्हॅन घेऊन तो उच्चायुक्तालयासमोर आला. भारतसमर्थकांशी त्यांची चकमक झाली. भारतविरोधकांनी ‘खलिस्तान आझादी’ आणि ‘आरएसएस दहशतवादी’ अशा घोषणा दिल्या. समर्थकांनी ‘वंदेमातरम्’ व ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा दिल्या.
नरेंद्र मोदी यांच्या लंडनभेटीच्या वेळी २0१६ मध्ये पंतप्रधान असाच संघर्ष झडला होता. ‘फ्रेंडस् आॅफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल’चे संचालक जयू शाह यांनी सांगितले की, आम्ही भारतीय लोकशाहीचा उत्सव साजरा करीत आहोत. आम्ही जशास तसे उत्तर देऊ. (वृत्तसंस्था)

आधीच झाली हकालपट्टी'

लॉर्ड अहमदच्या आंदोलनाबाबत भारत सरकारने ब्रिटनकडे आधीच चिंता व्यक्त केली आहे. सरकारी मालमत्तांचा भारतविरोधी प्रचारासाठी वापर करू दिला जाणार नसल्याचे आश्वासन ब्रिटिश सरकारने दिले होते. तथापि, खाजगी मालमत्तांच्या बाबतीत असे आश्वासन दिलेले नाही. पाकव्याप्त काश्मिरात जन्मलेला लॉर्ड अहमद इंग्लंडमध्येच वाढलेला आहे. तो लेबर पार्टीचा सदस्य होता. त्याला २0१२ मध्ये पक्षातून काढून टाकण्यात आले होते.

Web Title:  Rada of anti-India and opponent outside London's High Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.