पाकिस्तानातील दहशतवादामुळे यंदाही सार्क परिषद होण्याची शक्यता नाहीच ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 09:24 AM2017-09-23T09:24:11+5:302017-09-23T09:53:02+5:30

पाकिस्तानने दहशतवादाला दिलेल्या उघड पाठिंब्यामुळे भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेशाने बैठकीस नकार दिल्यानंतर 2016 साली पाकिस्तानात होणारी सार्क बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र यंदाही सार्क सदस्यांनी परिषदेसाठी कोणतीही उत्सुकता न दाखवल्यामुळे सार्क परिषद होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Question mark over saarc summit again | पाकिस्तानातील दहशतवादामुळे यंदाही सार्क परिषद होण्याची शक्यता नाहीच ?

पाकिस्तानातील दहशतवादामुळे यंदाही सार्क परिषद होण्याची शक्यता नाहीच ?

Next

न्यू यॉर्क, दि.23- पाकिस्तानने दहशतवादाला दिलेल्या उघड पाठिंब्यामुळे भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेशाने बैठकीस नकार दिल्यानंतर 2016 साली पाकिस्तानात होणारी सार्क बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र यंदाही सार्क सदस्यांनी परिषदेसाठी कोणतीही उत्सुकता न दाखवल्यामुळे सार्क परिषद होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणारा उघड पाठिंबा भारतीय उपखंडातील देशांमध्ये नाराजीचे कारण बनला आहे. मागील वर्षी सार्कचे यजमानपद पाकिस्तानकडे होते तर यावेळेस ते नेपाळकडे आहे.

दरवर्षी सार्क परिषद नोव्हेंबर महिन्यात होते मात्र अद्याप सदस्य राष्ट्रांनी कोणताही उत्साह दाखवलेला नाही. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी जमलेले असताना सार्क देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. तेथेही दहशतवादाचा मुद्दा उचलण्यात आला. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शांतता आणि सुरक्षेचे वातावरण असल्याशिवाय प्रादेशिक सहकार्य व भरभराट साधता येणार नाहीळअसे विधान केले. त्यामुळे सार्क परिषद यंदा होणार की नाही यावर चर्चा सुरु झाली आहे. भारताने बिमस्टेक, इब्सा

 अशा अनेक सहकारी संघटनांमध्ये दहशतवादाचे उच्चाटन करण्याकडे वारंवार लक्ष वेधले आहे तर पाकिस्तानला वगळून बीबीआयएन म्हणजे भारत, भूटान, बांगलादेश व नेपाळ यांची पायाभूत सुविधांबाबत सहकार्य करणार्या संघटनेची मोट भारताने बांधली आहे. दहशतावादाचे अड्डे पोसणार्या पाकिस्तानला सर्वच स्तरांवर एकटे पाडण्याचे प्रयत्न भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेश करत आहेत. यूएनच्या आमसभेत या तिन्ही देशांनी दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालतो हे उघडपणे पुराव्यांसकट मांडले त्यामुळे सार्क परिषदेवर पाकपुरस्कृत दहशतवादाची छाया गडद होत चालली आहे. पुढील वर्ष पाकिस्तानात निवडणुका असल्याने तेव्हा तरी सार्क परिषद होईल की नाही याबद्दलही खात्रीने कोणालाच सांगता येणार नाही

Web Title: Question mark over saarc summit again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.