अमेरिकेत असताना व्हीजिटर व्हीसाची मुदत संपली तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:55 AM2018-07-16T11:55:13+5:302018-07-16T13:45:05+5:30

अमेरिकेत पोर्ट ऑफ एन्ट्रीसाठी तुम्ही पोहोचलात की तुमचे अमेरिकेतील वास्तव्याचे नियमन होमलँड सिक्युरिटीज कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाचे (सीबीपी) अधिकारी करतील

Q: My U.S. visitor visa will expire while I am in the United States on vacation. Is there a problem with that? | अमेरिकेत असताना व्हीजिटर व्हीसाची मुदत संपली तर?

अमेरिकेत असताना व्हीजिटर व्हीसाची मुदत संपली तर?

googlenewsNext

प्रश्न- माझा यूएस व्हीजिटर व्हीसाची मुदत मी अमेरिकेत सुटीवर असतानाच संपणार आहे, त्यामुळे काही समस्या निर्माण होईल का?
उत्तर- नाही. तुमचा व्हिजीटर व्हीसा अमेरिकेत असताना संपला तर कोणतीही समस्या येणार नाही. अमेरिकेत पोहोचण्यासाठी तुम्हाला व्हीसाची मदत होईल तसेच पोर्ट ऑफ एन्ट्रीसाठीही त्याची मदत होईल. तुम्हाला व्हीसावर नमूद केलेल्या तारखेच्या आदी अमेरिकेत पोहोचावे लागेल.
अमेरिकेत पोर्ट ऑफ एन्ट्रीसाठी तुम्ही पोहोचलात की तुमचे अमेरिकेतील वास्तव्याचे नियमन होमलँड सिक्युरिटीज कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाचे (सीबीपी) अधिकारी करतील. सीबीपी अधिकारी तुमच्या आय-94 अर्जावर किंवा तुमच्या अॅडमिशन स्टॅम्पवर तुमच्या अमेरिकेतील वास्तव्याचा काळ नमूद करतील. त्याला अरायवल-डिपार्चर रेकॉर्ड असेही म्हणतात. हे रेकॉर्ड अत्यंत सुरक्षित सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.
या नमूद केलेल्या काळापेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहाणे तुम्हाला भविष्यात व्हीसा मिळण्यावर परिणाम करु शकते. तुम्ही अमेरिकेत आल्यावर सीबीपी अधिकाऱ्याने नमूद केलेल्या काळापेक्षा जास्त काळ अमेरिकेत वास्तव्य होणार नाही याची खात्री करणं महत्त्वाचं आहे. 
तुम्ही भारतात परत आल्यानंतर अमेरिकेत पुन्हा सुटीसाठी जाण्यासाठी तुम्हाला नवा व्हीजीटर व्हीसा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही ustraveldocs.com/in. येथे जाऊन व्हीसा मिळवण्यासाठी प्रयत्न करु शकता. 

Web Title: Q: My U.S. visitor visa will expire while I am in the United States on vacation. Is there a problem with that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.