अंतराळ पर्यटनाच्या प्रयत्नांना धक्का

By admin | Published: November 2, 2014 01:25 AM2014-11-02T01:25:04+5:302014-11-02T01:25:04+5:30

व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीचे अंतराळयान चाचणी उड्डाणादरम्यानच कोसळले. कॅलिफोर्नियात घडलेल्या या दुर्घटनेत वैमानिक ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला.

Push the Space Touring efforts | अंतराळ पर्यटनाच्या प्रयत्नांना धक्का

अंतराळ पर्यटनाच्या प्रयत्नांना धक्का

Next
लॉस एंजल्स : व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीचे अंतराळयान चाचणी उड्डाणादरम्यानच कोसळले. कॅलिफोर्नियात घडलेल्या या दुर्घटनेत वैमानिक ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. पर्यटकांना अंतराळात नेण्याच्या दृष्टीने खास रचना करण्यात आलेले हे यान कोसळल्यामुळे व्हजिर्नच्या अंतराळ पर्यटन सुरू करण्याच्या मोहिमेला धक्का बसला आहे. 
दूरचित्रवाणीवर शुक्रवारी प्रक्षेपित झालेल्या फुटेजमध्ये ‘स्पेसशिप-2’चे अवशेष लॉस एंजल्सच्या मोझावे भागातील झुडपांमध्ये इतस्तत: विखुरल्याचे दिसते. 
अमेरिकेत अंतराळयान दुर्घटनाग्रस्त होण्याची या आठवडय़ातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मंगळवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सामग्री नेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या मानवरहित अंतराळयानाचा प्रक्षेपणानंतरच स्फोट झाला              होता.  (वृत्तसंस्था)
 
‘स्पेसशिप टू’ दुर्घटनाग्रस्त होणो हा प्रसिद्ध ब्रिटिश व्यावसायिक व व्हर्जिनचे प्रमुख सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासाठी मोठा धक्का आहे. ब्रॅन्सन यांनी पर्यटन अंतराळ उड्डाणाचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. या दुर्घटनेचा व्हर्जिनच्या मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नसून अंतराळ पर्यटन सुरू करण्याचे आपले प्रयत्न सुरूच राहणार असल्याचा निर्धार ब्रॅन्सन यांनी व्यक्त केला. ब्रॅन्सन यांनी ते दुर्घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे सांगितले. मात्र, कॅलिफोर्निया महामार्ग गस्ती पथकाने या दुर्घटनेत वैमानिक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जखमी वैमानिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
च्या दुर्घटनेमुळे अंतराळ पर्यटन वास्तवात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. 
च्कालच्या दुर्घटनेमुळे आपणाला धक्का बसल्याचे व्हर्जिनचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सांगितले. मात्र, त्याचबरोबर पदरमोड करून अंतराळ प्रवास करू इच्छिणा:यांकरिता अंतराळ विमान निर्माण करण्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा आपण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

 

Web Title: Push the Space Touring efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.