भंगारातून बनवलेल्या कारची किंमत ४८ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 04:25 AM2017-11-25T04:25:44+5:302017-11-25T04:25:51+5:30

अमेरिकेच्या विन्स्कोसिन केन इमहॅफ नावाच्या एका गृहस्थाने ‘कॅनॉनबॉल रन’ नावाचा चित्रपट पाहिला.

The price of the car made of bronze is 48 lakhs | भंगारातून बनवलेल्या कारची किंमत ४८ लाख

भंगारातून बनवलेल्या कारची किंमत ४८ लाख

Next

अमेरिकेच्या विन्स्कोसिन केन इमहॅफ नावाच्या एका गृहस्थाने ‘कॅनॉनबॉल रन’ नावाचा चित्रपट पाहिला. त्यातील एक कार त्याला खूपच आवडली. तशी कार आपल्याकडे असावी, असं त्याला वाटू लागलं. ती विकत घेणं त्याला अशक्य होतं. त्यामुळे आपणच अशी कार बनवावी, असा विचार त्यानं केला. त्यानं चित्रपट पाहिला १९९0 साली. तो स्वत: इंजिनीअर असल्यानं त्याला ती बनवता आली. त्यासाठी त्यानं घराच्या बेसमेंटमध्ये कामाला सुरुवात केली. कारच्या आकाराचं एक लाकडी स्ट्रक्चर त्यानं तयार केलं. मग मेटलचा वापर करून ती कार पूर्ण केली.
हळूहळू कारचे पार्ट्स त्यानं इथून-तिथून गोळा केले. काही नवे, काही जुने. असं करता करता तशी कार बनवून झाली त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी म्हणजे २00८ साली. आता या कारचं करायचं काय, हा प्रश्न होता. त्याला ती चालवण्यात फारसा रस नव्हता. त्यामुळे ईबे या आॅनलाइन कंपनीवर तिची छायाचित्रं विक्रीसाठी ठेवली आणि किमान किंमत लावली ४८ लाख रुपये. म्हणजे ७५ हजार डॉलर्स. मियामीमध्ये राहणाºया एकाला ती कार आवडली आणि त्यानं ती विकतही घेतली.
अर्थात प्रत्यक्षात त्यानं ती केवढ्याला घेतली, हे माहीत नाही. पण ती कोणती कार होती माहीत आहे? ती होती लँबोर्गिनी! या कंपनीच्या नव्या कारची किंमत आजच्या घडीला आहे २ लाख डॉलर्स.

Web Title: The price of the car made of bronze is 48 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार