मंगळ ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता? संशोधकांमध्ये संचारला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:01 AM2018-06-09T02:01:06+5:302018-06-09T02:01:06+5:30

पृथ्वीबाहेरील अन्य ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध सतत सुरू असतो. चंद्रावरही जीवसृष्टी होती का, तिथे भविष्यात राहता येणे शक्य आहे का असे प्रश्न पडत असतात.

 The possibility of living on the planet Mars? Researchers are excited about the communication | मंगळ ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता? संशोधकांमध्ये संचारला उत्साह

मंगळ ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता? संशोधकांमध्ये संचारला उत्साह

Next

न्यू यॉर्क : पृथ्वीबाहेरील अन्य ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध सतत सुरू असतो. चंद्रावरही जीवसृष्टी होती का, तिथे भविष्यात राहता येणे शक्य आहे का असे प्रश्न पडत असतात. मात्र नासाच्या मार्स रोव्हर क्युरिओसिटी यानाला मंगळावरती काही जैविक अणू सापडले आहेत. कार्बनचा अंश असलेले बिल्डिंग ब्लॉक्सही (वीटसदृश्य ठोकळे) सापडले आहेत. त्यामुळे तेथे कधी काळी जीवसृष्टी असावी, असा अंदाज बांधला जात आहे.
मंगळाचे वय साडेतीन अब्ज वर्षे असून, त्याची माहिती व संशोधन यासाठी नासाने मार्स सोव्हर क्युरिओसिटी हे यान मंगळावर पाठवले आहे.
रोव्हरने दिलेल्या माहितीवर शोधनिबंध तयार करणाऱ्या जेनिफर एजिब्रोड यांनी सांगितले की, मंगळावर सापडलेल्या या गोष्टी म्हणजे तिेथे जीवसृष्टी होती, याचा पुरावा नाही. मात्र ते प्राचीन जीवसृष्टीचे अंश असण्याची शक्यता आहे. आपल्याकडे त्याची ठोस माहिती नाही इतकेच आता म्हणता येईल.
तिथे सजीव नव्हते असे अभ्यासातून लक्षात आले तरी सजीवांना खाण्यासाठी काहीतरी उपलब्ध होते, असा निष्कर्ष काढता येईल, असे सांगून त्या म्हणाल्या की, भूगर्भीय हालचालींमुळे मिथेन निर्माण होऊ शकतो. सापडलेले पदार्थ तिथेच कायमच राहिले असून, तीच उत्साहाची बाब आहे. (वृत्तसंस्था)

शक्यता नाकारता येत नाही
रोव्हरला सापडलेल्या गोष्टी जैविकदृष्ट्या तयार झाल्या होत्या, ही शक्यता नाकारता येत नाही. त्या जैविक होत्या, असेही आता खात्रीने सांगता येणार नाही. पण ती शक्यता संशोधनातून वगळली नसल्याचे नासाच्या कॅलिफोर्निया येथील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल)मधील वरिष्ठ संशोधक ख्रिस वेबस्टर यांनी सांगितले.

Web Title:  The possibility of living on the planet Mars? Researchers are excited about the communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.